Afghanistan attacks Pakistan
Edited Image
इस्लामाबाद: भारताकडून ऑपरेशन सिंदूरअंतर्गत मोठा धक्का बसल्यानंतर, पाकिस्तान आणखी एका मोठ्या संकटात सापडला आहे. बलुचिस्तान आर्मीने दावा केला आहे की, अफगाण सैन्याने पाकिस्तानवर हल्ला सुरू केला आहे. अफगाण सैन्याने पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आहे. बीएलएने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर बॉम्बस्फोट आणि टँक तैनात करताना दिसत आहे.
हेही वाचा - 'भारतात हिंदू-मुस्लिम दंगली घडवण्याचे दहशतवाद्यांचे उद्दिष्ट आहे'; ओवैसींकडून रियाधमध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश
अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर हल्ला -
माध्यमातील वृत्तानुसार, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अफगाणिस्तानमधून हल्ला करण्यात आला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने हा हल्ला केल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील लष्करी गतिरोध वाढला असून सीमावर्ती भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा - मोठा खुलासा! असीम मुनीरचं होता पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील मास्टरमाइंड?
पाकिस्तान सीमेजवळील चाघी येथे युद्ध -
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने दावा केला आहे की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील हे युद्ध पाक सीमेजवळील चाघी जिल्ह्यात सुरू झाले आहे. जिथे पाकिस्तान आणि तालिबान सैन्यांमध्ये भीषण चकमकी सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला आहे.