Army Mi-17 Chopper Crash: मोठी बातमी! लष्कराचं Mi-17 हेलिकॉप्टर कोसळलं; सर्व जवानांचा मृत्यू

पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व लष्करी कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Army Mi-17 Chopper Crash: मोठी बातमी! लष्कराचं Mi-17 हेलिकॉप्टर कोसळलं; सर्व जवानांचा मृत्यू

Army Mi-17 Chopper Crash:  पाकिस्तानमधून एक मोठी आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मुझफ्फराबादजवळ पाकिस्तान लष्कराच्या एव्हिएशन विभागाचे Mi-17 हे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व लष्करी कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पाकिस्तान लष्कराची प्रसारमाध्यम शाखा असलेल्या 'इंटर-सर्विसेस पब्लिक रिलेशन्स'ने (ISPR) या घटनेला दुजोरा दिला असून, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि ते कोसळले. प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असल्याचे म्हटले जात आहे.

तातडीने बचावकार्य सुरू; चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन
अपघाताची माहिती मिळताच लष्कराचे बचाव आणि शोध पथक (Rescue Teams) घटनास्थळी दाखल झाले. ISPR ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "या दुर्घटनेत विमानातील सर्व कर्मचारी शहीद झाले असून, कोणीही जिवंत वाचलेले नाही." दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पाकिस्तान लष्कराने एका उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. उड्डाणानंतर अचानक असे काय घडले ज्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले, याच्या तांत्रिक बाजूंचा कसून तपास ही समिती करणार आहे.

हेही वाचा – Pakistan-Afghanistan Conflict: पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला; 11 लहान मुलांसह 13 नागरिकांचा मृत्यू

लष्करप्रमुख आणि पंतप्रधानांकडून जवानांना श्रद्धांजली
या भीषण दुर्घटनेनंतर पाकिस्तानमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्यासह उच्च लष्करी अधिकाऱ्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली असून शोकाकुल कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत जवानांच्या बलिदानाला संपूर्ण देश सलाम करतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि पीडित कुटुंबांना या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी प्रार्थना केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number