Tuesday, November 18, 2025 04:09:37 AM

Trump Suspends US Aid to Colombia: कोलंबियाला आता अमेरिकेकडून सबसिडी मिळणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा

ट्रम्प यांनी कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांच्यावर ड्रग्जचा प्रचार केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोलंबियाला आता अमेरिकन सबसिडी मिळणार नाहीत.

trump suspends us aid to colombia कोलंबियाला आता अमेरिकेकडून सबसिडी मिळणार नाही ट्रम्प यांची मोठी घोषणा

Trump Suspends US Aid to Colombia: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिकन सैन्याने कॅरिबियनमध्ये ड्रग्ज वाहून नेणाऱ्या जहाजावर हल्ला केला आणि ते बुडाले. हल्ल्यादरम्यान, दोन दहशतवादी मारले गेले आणि इतर दोघांना जिवंत पकडण्यात आले आणि त्यांना त्यांच्या देशांमध्ये, इक्वेडोर आणि कोलंबियाला परत पाठवण्यात आले. आता, ट्रम्प यांनी कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांच्यावर ड्रग्जचा प्रचार केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोलंबियाला आता अमेरिकन सबसिडी मिळणार नाहीत.

हेही वाचा - India Boycotts Turkey: पाकिस्तानला साथ देणं पडलं महागात! तुर्की आणि अझरबैजानला भारताने शिकवला धडा

ट्रम्प यांनी या कारवाईचा व्हिडिओ शेअर करत म्हटले की हल्ल्यात नष्ट झालेली पाणबुडी फेंटानिल आणि इतर बेकायदेशीर ड्रग्जने भरलेली होती आणि ती अमेरिकेच्या दिशेने येत होती. त्यांनी या प्रकारच्या कारवायांमुळे अमेरिकन नागरिकांचे जीव वाचले आहेत असेही म्हटले. यानंतर ट्रम्प यांनी कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांच्यावर गंभीर आरोप करत कोलंबिया आता अमेरिकन अनुदान व सबसिडी मिळणार नाही, असा इशारा दिला. ट्रम्प यांनी पेट्रोवर देशात ड्रग्जच्या उत्पादनाला समर्थन देण्याचा आणि त्यासाठी उपाय न केल्याचा आरोप केला. तसेच परकीय मदत थांबवण्याची घोषणा केली. या विधानामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक नात्यांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा - Israeli Hamas War: गाझामध्ये पुन्हा युद्ध पेटले! इस्रायलचा हमासवर हवाई हल्ला

दरम्यान, ट्रम्प यानी पुढे म्हटलं की, गुस्तावो पेट्रो हा एक कमकुवत आणि अतिशय अलोकप्रिय नेता आहे, जो स्वतःची अवास्तव मते व्यक्त करतो. त्याने मृत्यूचा खेळ खेळणे थांबवावे अन्यथा अमेरिका त्याच्यासाठी आपले दरवाजे बंद करेल. ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटले होते की ड्रग्ज वाहून नेणारी पाणबुडी नष्ट करणे हा सन्मान आहे. त्यांनी सांगितले की, हे जहाज फेंटानिल आणि इतर बेकायदेशीर ड्रग्ज वाहून नेत होते. तथापी, व्हेनेझुएला आणि अन्य देशांनीही या प्रकारच्या सीक्रीट किंवा लष्करी कारवायींवर चिंता व्यक्त केली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री