Israeli Hamas War: गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष पुन्हा उग्र झाला आहे. अमेरिकेच्या अहवालानंतर, इस्रायली डिफेन्स फोर्सेस (IDF) ने रविवारी रफाह प्रदेशात हवाई हल्ला केला. सध्या इस्रायलने या हल्ल्याबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. इस्रायली चॅनल 12 च्या वृत्तानुसार, हा हल्ला रफाहमध्ये शुक्रवारी झालेल्या इस्रायली सैन्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु आयडीएफने हे स्पष्ट केले की रफाहमधील काही दहशतवाद्यांनी बोगद्यातून बाहेर पडून इस्रायली सैनिकांवर गोळीबार केला होता.
अमेरिकेचे आरोप आणि गुप्तचर अहवाल
अमेरिकेचे गुप्तचर अहवाल सांगतात की हमास गाझावासींवर हल्ला करण्याची आणि युद्धबंदी भंग करण्याची योजना करत आहे. या अहवालामुळे इस्रायलने आपली सैन्य कारवाई वाढवली आहे.
हेही वाचा - Langvin remarks on Indians in America: भारतीयांविरोधातील वक्तव्यामुळे अमेरिकेत खळबळ; फ्लोरिडातील राजकारणी चँडलर लँगविनवर कारवाई
नेतन्याहूची भूमिका
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी चेतावणी दिली की, हमास पूर्णपणे नि:शस्त्र होईपर्यंत गाझामधील युद्ध संपणार नाही. त्यांनी सांगितले की रफाह क्रॉसिंग उघडण्यासाठी हमासने सर्व ओलिस परत करणे आणि कराराच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
हेही वाचा - Donald Trump AI Video : 'मी राजा नाही...', 'No Kings'प्रदर्शनावर ट्रम्प यांनी स्वत:चाच व्हिडीओ केला शेअर, पाहून तुम्हीही व्हाल थक्क
ओलिस आणि मृतदेहांची देवाणघेवाण
दरम्यान, 10 ऑक्टोबरच्या करारानुसार, हमासने 20 जिवंत ओलिस सोडायचे होते, तर आयडीएफने गाझा परतल्यानंतर 72 तासांच्या आत 28 मृत ओलिसांचे मृतदेह सोपवायचे होते. तथापि, आतापर्यंत हमासने फक्त 10 मृतदेह परत केले आहेत, ज्यामुळे करार अर्धवटच राहिला आहे. गाझामधील परिस्थिती सध्या तणावपूर्ण आहे. तसेच इस्रायलच्या या हल्ल्यामुळे पुन्हा दोन्ही देशामधील संघर्ष चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.