Countries Where Poverty Is Illegal: जगात अनेक देश आहेत जिथे गरिबी, असमानता आणि बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. पण काही देश असेही आहेत जिथे 'गरीब असणं' ही कल्पनाच अस्तित्वात नाही. इतकंच नाही, तर काही ठिकाणी भिक मागणं हे गुन्ह्याच्या श्रेणीत गणलं जातं. मजबूत अर्थव्यवस्था, शिस्तबद्ध समाज आणि कठोर कायद्यांमुळे या देशांमध्ये तुम्हाला शोधूनही भिकारी सापडणार नाहीत.
पहिला देश म्हणजे स्वित्झर्लंड (Switzerland) यूरोपातील सर्वात श्रीमंत आणि सुरक्षित देशांपैकी एक. येथे 'कंगाल' असणं हे बेकायदेशीर मानलं जातं, असं म्हटलं जातं. कारण इथली सामाजिक सुरक्षा व्यवस्था इतकी मजबूत आहे की कोणालाही रस्त्यावर झोपावं लागत नाही. सरकारकडून प्रत्येक नागरिकाला निवारा देण्याची जबाबदारी घेतली जाते. ‘फेडरल हौसिंग पॉलिसी’ अंतर्गत जवळपास 60 टक्के नागरिकांना कमी भाड्यात अपार्टमेंट उपलब्ध करून दिलं जातं.
हेही वाचा: ASEAN Summit 2025: पंतप्रधान मोदी आसियान शिखर परिषदेत प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत; मलेशियाच्या पंतप्रधानांनी सांगितलं यामागचं कारण
स्वित्झर्लंडमध्ये किमान मासिक वेतन 4,000 यूरो म्हणजेच सुमारे 4 लाख रुपये आहे. बेरोजगार झाल्यास सरकारकडून मागील पगाराचा 80 टक्के भाग भत्ता म्हणून दिला जातो. इतकंच नाही तर करिअर रिट्रेनिंगचे कोर्सही विनामूल्य शिकवले जातात. आरोग्य सेवा देखील जवळपास मोफत असल्याने नागरिकांना मूलभूत गरजांची चिंता राहत नाही. स्विस फेडरल आकडेवारीनुसार, देशातील गरिबी दर केवळ 6.6 टक्के आहे, म्हणजेच कोणीही उपाशी राहत नाही.
या देशाची आणखी एक ओळख म्हणजे अत्यंत स्वच्छता आणि शिस्त. रस्त्यावर कचरा किंवा सिगारेटचा तुकडा टाकल्यास हजारो रुपयांचा दंड आकारला जातो. 1980 पासून ‘क्लीन स्वित्झर्लंड’ मोहिमेमुळे देशातील कचऱ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. पोलिसांना बंदूक बाळगण्याचीही गरज नसते कारण गुन्हेगारी दर फारच कमी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ‘क्राईम इंडेक्स’मध्ये स्वित्झर्लंड सर्वाधिक सुरक्षित देशांच्या यादीत अग्रस्थानी आहे.
दुसरा देश म्हणजे सिंगापूर (Singapore). इथे ‘Destitute Persons Act’ अंतर्गत भिक मागणं हा गुन्हा आहे. कोणी भीक मागताना आढळल्यास 1800 यूरो (सुमारे दोन लाख रुपये) दंड आणि तुरुंगवास ठोठावला जातो. सिंगापूरमध्येही सरकारकडून 80 टक्के नागरिकांना निवास उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे इथेसुद्धा रस्त्यावर भिकारी शोधणं जवळपास अशक्य आहे.
हेही वाचा: Pakistan-Afghanistan Conflict: पाकिस्तान-तालिबानमधील संघर्षाचे हे मूळ! 'ड्युरंड रेषा' काय आहे? अफगाणिस्तान याला सीमा का मानत नाही?
या देशात स्वच्छता आणि शिस्त यांना प्रचंड महत्त्व आहे. उदाहरणार्थ, सार्वजनिक ठिकाणी च्युईंगम खाणं हेही गुन्हा मानलं जातं. नियम मोडल्यास मोठा दंड ठोठावला जातो.
या दोन देशांच्या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते कठोर कायदे, जबाबदार शासन आणि नागरिकांची शिस्त जर एकत्र आली, तर 'भिकारीमुक्त देश' ही कल्पना अशक्य नाही. स्वित्झर्लंड आणि सिंगापूर हे त्याचं जिवंत उदाहरण आहेत.