नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के कर लादले आहे. या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात त्याचा काहीही परिणाम झालेला नाही, उलट भारताची अर्थव्यवस्था आणखी मजबूत झाल्याचं समोर आलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) दिलेल्या नव्या अंदाजानुसार, 2025-2026 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी (GDP) 6.6 टक्क्यांपर्यंत वाढेल. यापूर्वी हा दर 6.4 टक्के होता. म्हणजेच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जीडीपी 0.2 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आहवालानुसार, एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी तब्बल 7.8 टक्क्यांनी वाढला असून देशांतर्गत व्यापार आणि गुंतवणुकीमुळे ही वाढ अधिक वेगाने वाढली आहे.
हेही वाचा: Henley Passport Index: अमेरिकेचा पासपोर्ट टॉप 10 यादीतून बाहेर; सिंगापूर पहिल्या क्रमांकावर तर चीनचे स्थान सुधारले
आंतरराष्ट्रीय नानेनिधीच्या अंदाजामुळे स्पष्ट झाले आहे की, अमेरिकेच्या कर निर्णयाचा भारताच्या विकासावर कोणताही परिणाम झाला नाही, उलट भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली आहे. अलीकडेच, जागतिक बॅंकेनेही भारताच्या विकासदराचा अंदाज 6.3 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे, जागतिक संस्थांकडून भारताच्या आर्थिक कामगिरीला मिळालेला दुहेरी पाठिंबा ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक बाब मानली जात आहे. या घडामोडींमुळे, अमेरिकेचा भारताला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा डाव फसल्याचे स्पष्ट झाले आहे. उलट, भारताची अर्थव्यवस्था अधिक वेगाने प्रगती करत असल्याचे जगाने पुन्हा एकदा मान्य केले आहे.