‘प्रिन्स हॅरीला हाकलणार नाही; तो तर बिचारा आधीच पत्नीपीडित..’ डोनाल्ड ट्रम्प यांचं अजब विधान

Donald Trump on Prince Harry deport: डोनाल्ड ट्रम्प अवैधपणे अमेरिकेत स्थलांतरित झालेल्यांना देशातून बाहेर हुसकावत आहेत. मात्र, ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स हॅरी यांना ते बाहेर काढणार नसल्याचे म्हणाले.

‘प्रिन्स हॅरीला हाकलणार नाही; तो तर बिचारा आधीच पत्नीपीडित..’ डोनाल्ड ट्रम्प यांचं अजब विधान

Donald Trump on Prince Harry's Deportation: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर देशातील अवैधपणे स्थलांतरित झालेल्यांना बाहेर हुसकाविण्यास सुरुवात केली आहे. काही देशांमधील स्थलांतरितांना बेड्या ठोकून त्यांच्या त्यांच्या देशात विमानाने पाठवून देण्यात आलेले आहे. यानंतर आता ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स हॅरी यांच्या इमिग्रेशन वादाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. 

डोनाल्ड ट्रम्प पूर्वीपासून अजब वक्तव्य आणि विक्षिप्त वागणुकीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेकदा सोशल मीडियावर खिल्लीही उडवली जाते. त्यांच्यावर नेटिझन्सनी अनेकदा मीम्सदेखील बनवली आहेत. तसेच, काही वेळा त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले आहे. त्यांच्यावर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. तर, ट्विटरने त्यांचं अकाउंट पूर्णपणे बंद करून टाकलं होतं.

हेही वाचा – मेक्सिकोने सोडला सुस्कारा; आयातशुल्क महिनाभर स्थगित, कॅनडा, चीनला दिलासा नाहीच

सध्या ट्रम्प यांनी देशात अवैधपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांना हाकलून लावण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, प्रिन्स हॅरी यांना अमेरिकेच्या बाहेर जाण्यास सांगणार नसल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत. न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी चक्क प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन मर्केल हिचा उल्लेख केला. 'प्रिन्स हॅरी हे आधीच पत्नीकडून त्रासलेले आहेत, त्यामुळे त्यांना बाहेर काढण्याचा आमचा कोणताही विचार नाही', असे थेट विधान ट्रम्प यांनी केले.

ट्रम्प यांनी न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत मेगन मार्कल यांचा उल्लेख करत 'मी प्रिन्स हॅरी यांना बाहेर काढू इच्छित नाही. मी त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून देतोय. ते आधीच पत्नीकडून त्रासलेले आहेत. त्यांची पत्नी हे एक वेगळेच प्रकरण आहे', असे अजब विधान केले. प्रिन्स हॅरी हे जानेवारी 2020 मध्ये राजघराण्यातून बाहेर पडले आणि त्यांनी मेगन मार्केल यांच्या घरी म्हणजे कॅलिफोर्नियात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. कॅलिफोर्नियात आल्यानंतर त्यांनी एक एनजीओ स्थापन केली आहे.

सध्या ट्रम्प यांनी अमेरिकेतील घुसखोरांना बाहेर काढण्याचा चंग बांधला आहे. प्रिन्स हॅरी यांनी भूतकाळात अमली पदार्थांचा वापर केला होता. मात्र ही बाब त्यांनी अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांपासून लपवून ठेवली. प्रिन्स हॅरी यांनी काही काळापूर्वी ‘स्पेअर’ हे आत्मचरित्र लिहिले होते. ज्यात त्यांनी पूर्वी अंमली पदार्थांचे सेवन केले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे खोटी माहिती दिल्याने त्यांच्या अमेरिकच्या व्हिसावर प्रश्न उपस्थित झाले. प्रिन्स हॅरी यांच्या इमिग्रेशनचा वाद सध्या वॉशिंग्टनमधील न्यायालयात सुरू आहे. अमेरिकेतील हेरिटेज फाऊंडेशन या पुराणमतवादी संस्थेने प्रिन्स हॅरी यांच्या व्हिसाबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

हेही वाचा – सानिया मिर्झाने दुबईतील घरातून शोएब मलिकचं नाव हटवलं, आता लिहिलंय 'या' व्यक्तीचं नाव

प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगनचे तणावपूर्ण संबंध, ट्रम्प यांच्याशीही तणाव
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या विधानाला गतकाळातील वादाची पार्श्वभूमी आहे. जो बायडेन राष्ट्राध्यक्ष असताना ब्रिटनच्या राजघराण्याला विशेष वागणूक दिली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच, ट्रम्प यांनी हॅरी यांची अनेकदा खिल्लीही उडविली होती. मेगन मार्केल यांनी प्रिन्स हॅरीला चाबकाने मारले होते, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. ब्रिटिश राजघराण्यातूनही ट्रम्प यांना लक्ष्य करण्यात येते. 2016 च्या निवडणुकीत मेगन मार्केल यांनी ट्रम्प यांना विभाजनवादी आणि स्त्रीद्वेषी म्हटले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number