‘7500’ हायजॅक कोड अन् वैमानिकांमधील वाद… दुबई-तेल अवीव विमानात अपहरणाचा संशय; इमर्जन्सी लँडिंगमुळे खळबळ

विमानातील पायलटने आधी सामान्य आपत्कालीन परिस्थिती दर्शवणारा '7700' हा कोड पाठवला. मात्र, काही वेळातच बेकायदेशीर हस्तक्षेप किंवा अपहरण दर्शवणारा '7500' हा अत्यंत संवेदनशील कोड जारी केल्याने सुरक्षा यंत्रणांचे धाबे दाणवले.
Dubai Tel Aviv flight hijacking attempt Dubai Tel Aviv flight hijacking attempt
दुबईहून निघालेल्या विमानात अपहरणाचा प्रयत्न?

Dubai Tel Aviv Flight Hijacking: दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे उड्डाण भरलेल्या FZ1073 या विमानाने सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत असताना अचानक हायजॅक (अपहरण) आणि आणीबाणीचे संकेत दिल्याने गुरुवारी जागतिक स्तरावर मोठा गोंधळ उडाला. विमानातील पायलटने आधी सामान्य आपत्कालीन परिस्थिती दर्शवणारा ‘7700’ हा कोड पाठवला. मात्र, काही वेळातच बेकायदेशीर हस्तक्षेप किंवा अपहरण दर्शवणारा ‘7500’ हा अत्यंत संवेदनशील कोड जारी केल्याने सुरक्षा यंत्रणांचे धाबे दाणवले. या विमानात एकूण 180 प्रवासी प्रवास करत होते, ज्यामध्ये 150 इस्रायली नागरिकांचा समावेश होता. घटनेचे गांभीर्य ओळखून हे विमान तातडीने सौदी अरेबियातील ताबूक विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

इस्रायली लढाऊ विमाने रवाना; नेतान्याहू यांनी बोलावली तातडीची बैठक

हायजॅकिंगचा कोड मिळताच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्र्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय तातडीची बैठक घेतली. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी इस्रायली हवाई दलाची लढाऊ विमानेही विमानाच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. सुरुवातीला कॉकपीटमध्ये वैमानिकांमध्ये झटापट झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. इस्रायली सुरक्षा सूत्रांनुसार, वैमानिकांमधील आपापसातील वादामुळे किंवा तांत्रिक चुकीमुळे असा हायजॅकिंगचा सिग्नल गेला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा – पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्याची लाट; 25 हजार नागरिक रस्त्यावर, नियंत्रण रेषेकडे कूच

लँडिंगनंतर फ्लाइट ट्रॅकिंग साइटवरून विमान गायब; तपास सुरू

सौदी अरेबियाच्या ताबूक विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर हे विमान फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट्सवरून अचानक दिसेनासे झाले, ज्यामुळे संभ्रम आणखी वाढला. सध्या विमानातील सर्व 180 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली असून, सौदी व इस्रायली यंत्रणा या कोड आणि घटनेमागील मुख्य कारणाचा अधिक तपास करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version