Sunday, November 16, 2025 06:24:39 PM

Elon Musk On Job Cuts: एलोन मस्क यांचे AI बद्दल मोठं भाकित! नोकर कपातीबद्दलही केलं धक्कादायक विधान

टेक इंडस्ट्रीमध्ये आधीच अनेक कंपन्यांनी एआयच्या वापरामुळे हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. गुगल, मायक्रोसॉफ्टपासून टीसीएसपर्यंत अनेक लोकांचा एआयमुळे रोजगारावर परिणाम झाला आहे.

elon musk on job cuts एलोन मस्क यांचे ai बद्दल मोठं भाकित नोकर कपातीबद्दलही केलं धक्कादायक विधान

Elon Musk On Job Cuts: टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि नोकर कपातीबाबत धक्कादायक विधान केलं आहे. मस्कच्या म्हणण्यानुसार, भविष्यात एआय आणि रोबोट्स जवळजवळ सर्व नोकऱ्या ताब्यात घेऊ शकतात. टेक इंडस्ट्रीमध्ये आधीच अनेक कंपन्यांनी एआयच्या वापरामुळे हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. गुगल, मायक्रोसॉफ्टपासून टीसीएसपर्यंत अनेक लोकांचा एआयमुळे रोजगारावर परिणाम झाला आहे.

हेही वाचा - Block Unwanted Calls: स्पॅम कॉल्स, मेसेजने त्रस्त आहात? फक्त 'हा' नंबर फिरवा आणि त्रास मिटवा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर एका वापरकर्त्याच्या पोस्टला उत्तर देताना मस्क यांनी म्हटले की, भविष्यात लोकांना भाज्या खरेदी करण्याऐवजी स्वतः वाढवण्याचा पर्याय असेल, कारण रोबोट्स सर्व कामे सांभाळतील. जेसन नावाच्या वापरकर्त्याने आपल्या पोस्टमध्ये अ‍ॅमेझॉन येत्या काळात 60,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची शक्यता असल्याचे नमूद केले होते. यावर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी एआय आणि नोकर कपातीसंदर्भात महत्त्वपूर्ण खुलासा केला. 

हेही वाचा -AI Browser: AI ब्राउजरचा वापर करताना घ्या खबरदारी! तुमचा वैयक्तिक डेटा होऊ शकतो लीक

एआयच्या संभाव्य धोक्यांबद्दल शक्यता वर्तवणारे मस्क हे पहिले व्यक्ती नाहीत. यापूर्वी एआयचे गॉडफादर जेफ्री हिंटन यांनी देखील याबाबत इशारा दिला होता. तरीही, मस्क स्वतः एआय प्रकल्पांमध्ये सक्रिय आहेत. टेस्लासाठी ऑप्टिमस रोबोटसारख्या ऑटोनॉमस प्रकल्पांवर काम करत असलेली मस्कची कंपनी xAI, दररोज सोशल मीडियावर या रोबोट्सचे व्हिडिओ शेअर करते. मस्कच्या या विधानाने एआयच्या भविष्यातील संभाव्य परिणामांबाबतच्या चर्चांना पुन्हा एकचा तोंड फुटलं आहे.  


सम्बन्धित सामग्री