SpaceX Starship rocket explodes
Edited Image
SpaceX Starship Rocket Explodes: एलोन मस्कला मोठा धक्का बसला आहे. स्पेसएक्स स्टारशिप रॉकेटचा चाचणी दरम्यान बॉम्बसारखा स्फोट झाला. हे रॉकेट अवकाशात उड्डाण करण्याच्या शेवटच्या टप्प्यात होते. भारतीय वेळेनुसार आज सकाळी 9:30 वाजता हे रॉकेट प्रक्षेपित होणार होते, परंतु अग्नि चाचणी दरम्यान त्याचा स्फोट झाला. या रॉकेटमधील स्फोटाबाबत स्पेसएक्सने अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात स्पेसएक्सने म्हटलं आहे की, चाचणी स्थळावरील परिस्थिती नियंत्रणात असून सर्वजण सुरक्षित आहेत.
हेही वाचा - एलोन मस्कच्या Starlink ला भारतात मंजूरी; आता देशभरात थेट उपग्रहावरून इंटरनेट उपलब्ध होणार
यासंदर्भात माहिती देताना स्पेसएक्सने म्हटलं आहे की, स्टारशिप त्याच्या दहाव्या उड्डाण चाचणीची तयारी करत असताना मोठी दुर्घटना घडली. संपूर्ण ऑपरेशन दरम्यान चाचणी स्थळाभोवती सुरक्षा क्षेत्र तयार करण्यात आले होते. सर्व कर्मचारी सध्या सुरक्षित आहेत. आमची स्टारबेस टीम चाचणी स्थळ आणि आजूबाजूच्या परिसराची सुरक्षा करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत सक्रियपणे काम करत आहे. जवळपासच्या रहिवाशांना यामुळे कोणताही धोका पोहोचलेला नाही.
चाचणी दरम्यान स्पेसएक्स स्टारशिप रॉकेटचा स्फोट, पहा व्हिडिओ -
हेही वाचा - व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामला टक्कर देण्यासाठी एलोन मस्क यांनी लाँच केले XChat; काय आहेत खास?
स्टारशिप 36 चे हे रॉकेट आगामी चाचणी उड्डाणासाठी निवडले गेले होते. या रॉकेटची टेक्सासमधील स्टारबेस सुविधेवर नियमित इंजिन स्थिर अग्नि चाचणी केली जात होती. अग्नि चाचणी दरम्यान रॉकेटचा मोठा स्फोट झाला. रॉकेटचा स्फोट होताच, सर्व आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्यात आले.