Iran Isreal War Actress Stuck: "मोदीजी मी अडकले आहे" अमेरिके-इस्रायल आणि इराणच्या युद्धादरम्यान अडकलेल्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची मोदींना हाक

मध्यपूर्वेत अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर संयुक्त युद्धाच्या पार्श्वभूमिवर दुबईमधून येणार जाणारे विमानसेवा रद्द झाली आहे. ज्यामुळे जन्नत चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनल चौहान दुबईमध्ये अडकली आहे.

Iran Isreal War Actress Stuck: &quotमोदीजी मी अडकले आहे&quot अमेरिके-इस्रायल आणि इराणच्या युद्धादरम्यान अडकलेल्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची मोदींना हाक

मध्यपूर्वेत अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केला आहे. ज्यात आतापर्यंत 200 इराणी नागरिकांच्या मृत्यू झाला असून 800 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अशातच तिन्ही देशांमध्ये सुरू झालेल्या या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम दुबईवर देखील झाला आहे. दुबईमधून येणार जाणारे विमानसेवा रद्द झाली असून लाखो प्रवासी दुबईमध्ये अडकली आहे. अशातच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जन्नत चित्रपटातील लीड अॅक्ट्रेस सोनल चौहान ही देखील दुबईमध्ये अडकली आहे. याचपार्श्वभूमिवर अभिनेत्री सोनल चौहान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची हाक दिली आहे. तिने इंस्टाग्राम आणि ट्वीट करून भारत सरकारकडे मदत मागितली आहे. ही दुबईमध्ये शुटिंगसाठी गेली आहे. 

हेही वाचा- Strait of Hormuz Crisis: जगाची ऊर्जा लाइफलाइन धोक्यात! इराणच्या कठोर पावलाने तेलबाजारात खळबळ, दर गगनाला भिडणार?
यावेळी तिने पोस्ट करत म्हटलं आहे की, "माननीय पंतप्रधान @narendramodi जी, सध्याच्या संकटात मी दुबईमध्ये अडकलो आहे. विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि भारतात परतण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग नाही. मला सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी मदत करण्यासाठी मी सरकारचे मार्गदर्शन आणि पाठिंबा मागत आहे. सरकारकडून कोणत्याही मदतीसाठी आणि सुरक्षित परतीसाठी मार्गदर्शन मिळाल्यास मी मनापासून आभारी राहीन @meaindia @india_in_dubai"

अमेरिका-इस्रायलची इराणविरोधात संयुक्त मोहीम
अमेरिका आणि इस्त्रायलने एकत्र येते इराणवर संयुक्त हल्ला केला आहे. त्यानंतर इराणने सुद्धा प्रत्युत्तर देत इस्रायलसह कतार, कुवेत, बहारिन, संयुक्त अरब अमिराती इथल्या अमेरिकी लष्करी तळांवर प्रतिहल्ले करून जशास तसे उत्तर दिले आहे. यादरम्यान दुबईजवळ असलेल्या अमेरिकेनं सैन्याच्या तळावर हल्ले झाले आहे. तिन्ही देशांमध्ये सुरू झालेल्या या युद्धजन्य परिस्थितीमुळे आशिया खंडात आणि अरब राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भारतीय विमान कंपन्यांसह जगभरातील कंपन्यांनी पश्चिम आशियातील विमानसेवा स्थगित केली असून इराण, इराक, कुवेत, इस्रायल आणि बहारिन या देशांची हवाई हद्द शनिवारी पूर्ण रिकामी होती. तर ग्रीस, स्पेन, फ्रान्स, तुर्कीस जपान, अझरबैजान, ब्रिटन, नॉर्वे इत्यादी देशांच्या विमान कंपन्यांनी विमान उड्डाणे रद्द केल्याचं जाहीर केलं. त्यामुळे दुबई विमानतळावरील उड्डाणेसुद्धा रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे दुबई अनेक जण अडकले आहे. 

हेही वाचा- Israel vs Iran War: पश्चिम आशियात महायुद्धाचा वणवा; इस्रायल, अमेरिका, इराण पाठोपाठ आता 'या' देशाची एन्ट्री
कोण आहे सोनल चौहान?
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या जन्नत या चित्रपटातून सोनल चौहानने लोकांच्या मनात घर केले. कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, सोनलने सितारा, लेजेंड, 3G, बुड्ढा होगा तेरा बाप, साइज झिरो, रूलर, पलटन, डिक्टेटर, द पावर, द घोस्ट आणि आदिपुरुष अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. तसेच हिंदीसोबत तेलुगू, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केले आहे. यााआधी तिने मॉडेल म्हणून 2005 मध्ये मलेशियात 'मिस वर्ल्ड टुरिझम' चा पुरस्कार जिंकला होता. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number