Nigeria Flood: नायजेरियातील नायजर राज्यात मोठा पूर आला आहे. या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. घरांमध्ये, बाजारपेठांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी शिरले आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरात 117 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण बेपत्ता झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो. मध्य नायजेरियातील नायजरमधील मार्केट टाउनमध्ये तीव्र पूर आला.
हेही वाचा - तुफान पावसानंतर गावातला अख्खा पूलच गेला वाहून; नशीब दिवस होता.. नाहीतर..
अनेक तासांच्या मुसळधार पावसानंतर हा पूर आला. तसेच जवळचा धरण फुटल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. राजधानी मिन्ना येथील आपत्कालीन ऑपरेशन ऑफिसचे प्रमुख हुसैनी इसा यांनी वाढत्या मृत्यूंची पुष्टी केली. तथापि, हुसैनी इसा यांनी शुक्रवारी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, अधिकाऱ्यांनी 117 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. आतापर्यंत 88 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अनेक लोक बेपत्ता आहेत. पुरामुळे या प्रदेशातील व्यवसाय आणि दैनंदिन जीवनही विस्कळीत झाले आहे.
हेही वाचा - साताऱ्यात पहिल्याच पावसामुळे दणादण; रस्त्यावरून गाडी चालवणं अवघड झाल्याने चक्क बाईकच खांद्यावर उचलली
दरम्यान, नायजेरियाला अशा पुराचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरवर्षी, हंगामी पावसामुळे नायजर आणि बेन्यू सारख्या नद्या दुथडी भरून वाहतात, ज्यामुळे जवळपास राहणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका निर्माण होतो.