Sunday, August 17, 2025 05:08:43 AM

तुफान पावसानंतर गावातला अख्खा पूलच गेला वाहून; नशीब दिवस होता.. नाहीतर..

अंदाजित वेळेपेक्षा 8 दिवस अगोदर आणि मागील 16 वर्षांच्या तुलनेत मोसमी वारे सर्वात लवकर दाखल झाले आहेत. राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस सात जून रोजी दाखल होतो.

तुफान पावसानंतर गावातला अख्खा पूलच गेला वाहून नशीब दिवस होता नाहीतर

Bridge Washed Away : कडक उन्हाळ्याचा मे महिना निम्म्यावर आला असतानाच पाऊस सुरू झाला. मे महिना संपत येईपर्यंत हेच पावसाचं चित्र कायम राहिलं आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं नुकसान होण्यासोबतच अनेक ठिकाणी छोट्या नदी-ओढ्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. याच्यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. आता एका ठिकाणचा पूलच वाहून गेल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मात्र, हा कोणत्या ठिकाणचा व्हिडिओ आहे, हे अद्याप समजलेलं नाही.

यातून नद्या नाल्यांना पाणीच पाणी आले आहे. या मुसळधार पावसामुळे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे पाणीपातळी पूर्ण संचय पातळीच्या वर गेली असून, सध्या बंधाऱ्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान केंद्राने पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यंदा राज्यात पावसाचं आगमन लवकर झालंय. मात्र, या पावसानं राज्यातील अनेक भागांना झोडपून काढलंय. दरम्यान अशाच एका गावात अख्खा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हेही वाचा - बुडत्या नावेत सेल्फी घेत होत्या तरुणी, नेटिझन्स म्हणाले, 'विमा कंपनी क्लेमही नाही स्वीकारणार!'

हा व्हिडिओ पाहून ऑगस्ट 2016 मध्ये महाडमध्ये सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या दुर्घटनेत रात्री उशिरा पूल वाहून गेल्यामुळे आणि या भागातून जाणाऱ्या अनेक वाहनांना पूलच जागेवर नसल्याचे लक्षात न आल्यामुळे अनेक वाहने वाहून गेली. संपूर्ण देशाचा थरकाप उडवणारी ही घटना होती. या काळात संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. सावित्री नदीने रौद्ररूप धारण केलेले असताना हा पूल रात्रीच्या वेळी वाहून जाणं हे एक मोठं दुर्दैवच होतं.

तर, आताच्या व्हायरल व्हिडिओमध्ये हा लहान पूल दिवसा वाहून जाताना सर्व लोकांनी पाहिल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. डोळ्यासमोर पूल वाहून गेल्यामुळे गावकऱ्यांनाही धक्का बसला. सुदैवानं यावेळी पुलावरची वाहतूक बंद होती. तसेच यात कुणाचा बळीही गेला नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गावकरी जमले आहेत आणि त्यांच्यासमोरच अवघ्या काही सेकंदांमध्ये पूल वाहून गेला आहे. यावेळी गावकरी आरडा ओरडा करतानाही दिसत आहेत.

मोसमी पावसाने नेहमीच्या वेळेपेक्षा सुमारे दोन आठवडे आधीच, रविवारी महाराष्ट्राची सीमा ओलांडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तसेच कर्नाटक, गोव्यात मोसमी पावसाचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून वाटचालीस पोषक स्थिती असल्याने येत्या दोन-तीन दिवसांत मोसमी वारे मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. अंदाजित वेळेपेक्षा 8 दिवस अगोदर आणि मागील 16 वर्षांच्या तुलनेत मोसमी वारे सर्वात लवकर दाखल झाले.

हेही वाचा - स्वागतार्ह पाऊल! मुस्लीम पित्याला मुलींनी दिला अग्नी; हिंदू पद्धतीने केले अंत्यसंस्कार

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी वारे रविवारी तळकोकणात दाखल झाले. केरळमध्ये वेळेआधीच, शनिवारी दाखल झालेल्या मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे 24 तासांच्या आत संपूर्ण गोवा व्यापून मोसमी वारे राज्यात दाखल झाले. पुढील तीन दिवसांत मुंबई, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्य व्यापले जाईल, असा अंदाज आहे.


सम्बन्धित सामग्री