Florida Learjet 60 Plane Crash Audio and Mayday Call Pilot Last Words ATC: अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यामध्ये रविवारी दुपारी एक खासगी आणि व्यावसायिक स्वरूपाचे लिअरजेट 60 हे जेट विमान पाम बीच काउंटीमधील ग्रीनएकर्स येथील एका दाट लोकवस्तीच्या निवासी भागाजवळ कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. या हृदयद्रावक अपघातात विमानामधील सर्व 9 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विमान थेट निवासी इमारती आणि वाहनांच्या जवळ कोसळले. या वेळी दुर्घटनास्थळी मोठा स्फोट होऊन आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट परिसरात पसरले होते. परंतु, सुदैवाने त्या परिसरातील कोणत्याही स्थानिक नागरिकाची जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याचे कोणतेही वृत्त समोर आलेले नाही.
विमान कोसळण्यापूर्वी एटीसीसोबतचा थरारक संवाद समोर; ‘मेडे’ कॉलद्वारे मागितली होती मदत
दुर्घटना घडण्यापूर्वीच्या अत्यंत नाट्यमय आणि भयानक परिस्थितीची माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या (ATC) ऑडिओ रेकॉर्डिंगमधून उघड झाली आहे. उड्डाणादरम्यान हवामानाची स्थिती अचानक बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर वैमानिकांनी तातडीने मदतीसाठी ‘मेडे’ (MAYDAY) कॉल केला होता. विमान पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेले असून प्रतिमिनिट तब्बल 20,000 ते 30,000 फूट एवढ्या प्रचंड वेगाने वेगाने जमिनीच्या दिशेने खाली जात असल्याची माहिती क्रू मेंबर्सनी दिली होती. ‘आम्ही मरणार आहोत, आमच्याकडे अजिबात वेळ उरलेला नाही,’ असे उद्गार विमानातील एका महिला कर्मचाऱ्याच्या तोंडून आल्याचे या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे ऐकायला मिळाले आहे.
“We’re out of time.” Those may be some of the last words heard from the cockpit of the private jet that plunged into a Florida neighborhood Sunday. Audio circulating online appears to capture the pilots of the Learjet 60 talking with air traffic control before the crash in Greenacres, Palm Beach County. The FAA says nine people were on board, flying from Austin, Texas, to the Bahamas. Instead of a vacation, the jet dropped from cruising altitude almost straight down and exploded into a mobile home park just before 1 p.m. Reports say none of the nine survived. Nine families woke up expecting a trip to paradise, and tonight they’re getting the worst call of their lives. The NTSB is now trying to figure out what went so wrong, so fast. What do you think could cause a jet to fall out of the sky that quickly? — Tony Lane 🇺🇸 (@TonyLaneNV) November 1, 2026
हेही वाचा – अचानक रस्त्यावर कोसळताच मोठा स्फोट! अंगावर काटा आणणारा विमान अपघात; एकही जण वाचला नाही
35 हजार फूट उंचीवरून अचानक विमान खाली कोसळले
उड्डाण करत असताना वैमानिकांनी विमानाला हलकी हिमवृष्टी, मध्यम स्वरूपाचे टर्बुलन्स आणि हवामानातील अचानक झालेल्या बदलांचा सामना करावा लागत असल्याचे एटीसीला आधीच कळवले होते. हे खासगी विमान जवळपास 35000 फूट इतक्या उंचावरून अचानक खाली गडगडले आणि मॉनिटरी ट्रेलजवळ येऊन आपटले. फ्लोरिडाचे गव्हर्नर र्रॉन डिसाँटिस यांनी या विमानाचे जमिनीवर कोसळणे म्हणजे एखादे क्षेपणास्त्र आदळल्यासारखे भासले, अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर अमेरिकेचे परिवहन सचिव शॉन डफी यांनी या अपघातात एकूण 9 जणांचा बळी गेल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.
NEW: Witnesses say it sounded like a missile. A $2 million private jet dropped out of the sky and slammed into a mobile home park in Palm Beach County, Florida, and authorities say multiple people are dead. The plane, believed to be a Learjet 60 that took off from Austin, Texas, crashed just before 2 p.m. Sunday in Greenacres, west of West Palm Beach. Flight tracking data shows it was cruising at more than 35,000 feet before it suddenly plunged almost straight down. It clipped a tree, took out power lines, and hit a mobile home, leaving a fireball and a crater in the ground. Palm Beach County Fire Rescue declared a mass casualty incident. No one knows yet how many people were on the plane or if anyone was inside that home. The FAA and NTSB are now investigating what caused it. Please keep every family touched by this in your prayers tonight. What’s the first thing that went through your mind when you saw this video? — Tony Lane 🇺🇸 (@TonyLaneNV) November 1, 2026
फेडरल एव्हिएशन प्रशासन आणि एनटीएसबीकडून सखोल चौकशी सुरू
या भीषण विमान अपघाताचे नेमके कारण काय असावे, याचा शोध घेण्यासाठी फेडरल एव्हिएशन प्रशासन (FAA) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) यांनी संयुक्तपणे तातडीने तपास सुरू केला आहे. विमानातील उड्डाणविषयक नोंदी, ब्लॅक बॉक्स, कॉकपिटमधील वैमानिकांचे संभाषण, त्यावेळची हवामानाची स्थिती आणि इतर तांत्रिक पुरावे कसून तपासले जात आहेत, मात्र दुर्घटना नक्की कशामुळे घडली याचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.