नवी दिल्ली: मादागास्करमध्ये Gen Z आंदोलकांनी अखेर सरकार उलथवून टाकले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या तरुणांच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय सभेने सरकारविरोधात महाभियोग ठराव मंजूर केला आणि सरकार बरखास्त करण्यात आले. त्यानंतर, राष्ट्रपती अँड्री राजोएलिना हे फ्रेंच लष्करी विमानाने देश सोडून पळून गेले असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर, सध्या या देशाचा ताबा लष्कराने घेतला आहे. एलिट कॅपसॅट युनिटचे कमांडर कर्नल मिशेल रॅंड्रियानिरिना यांनी लष्कराने सत्ता हाती घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे, लवकरच लष्कर आणि जेंडरमेरी अधिकाऱ्यांची परिषद नवीन पंतप्रधान नियुक्त करून नवे सरकार स्थापन करणार आहे.
हे आंदोलन सुरुवातीला अनियमित पाणी आणि वीज पुरवठा या समस्यांमुळे सुरू झाले होते. मात्र, नंतर भ्रष्टाचार, प्रशासनातील बेफिकिरी आणि वाढती गरिबी या मुंद्द्यांवर देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी जपानी अॅनिमे 'वन पीस' चे झेंडे आणि मालागासी तिरंगा घेऊन मोर्चे काढले होते. विशेष म्हणजे, या Gen Z आंदोलनाला लष्कराचाही पाठिंबा मिळाला. 2009 मध्ये ज्या लष्कराने राजोएलिनांना सत्तेत आणले होते, त्याच लष्कराने आता त्यांना पदावरून हटवले आहे. पोलीस आणि निमवष्करी दलांनाही सरकारचा विरोध केला. त्यामुळे, Gen Z आंदोलनाला अखेर यश मिळाले आणि मादागास्करमध्ये नवे राजकीय पर्व सुरू झाले आहे.
हेही वाचा: Donald Trump : अमेरिकेचा डाव फसला! भारताचा GDP वेगाने वाढला; IMF चा अंदाज
काही महिन्यांपूर्वी, सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी सारख्या विविध कारणांमुळे Gen Z आंदोलकांनी नेपाळमध्ये तीव्र आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार, या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि Gen Z आंदोलकांनी थेट नेपाळमधील संसद भवनावर हल्ला केला, ज्यामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आणि के.पी.शर्मा ओली यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागले. या आंदोलनामुळे नेपाळमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी कर्फ्यू करावा लागला आणि तेथील सरकारला सोशल मीडियावरील बंदी मागे घ्यावी लागली.