Israel on Ceasefire : ‘इराणसोबत शस्त्रसंधी करताना आम्हाला साधं विचारलंही नाही’; इस्रायल अमेरिकेवर संतापला, नेतान्याहूंचा युद्धाचा निर्धार कायम

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या शस्त्रसंधीनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना आक्रमक विधान केले आहे. त्यामुळे शस्त्रसंधी कागदावरच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Israel on Ceasefire : ‘इराणसोबत शस्त्रसंधी करताना आम्हाला साधं विचारलंही नाही’; इस्रायल अमेरिकेवर संतापला, नेतान्याहूंचा युद्धाचा निर्धार कायम

Israel unhappy with US Iran ceasefire deal : इराण आणि अमेरिका यांच्यातील 2 आठवड्यांच्या शस्त्रसंधीला 24 तास उलटण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी ठिणगी पडली आहे. अमेरिकेने इराणचा 10 कलमी प्रस्ताव मान्य करून युद्धविराम जाहीर केला असला, तरी इस्रायलने या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इराणशी चर्चा करताना अमेरिकेने आम्हाला पूर्णपणे अंधारात ठेवले आणि प्रक्रियेतून बाजूला सारले, असा गंभीर आरोप इस्रायलने केला आहे. सुरुवातीला या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या इस्रायलने अवघ्या काही तासांत आपली भूमिका बदलल्याने आता अमेरिका आणि इस्रायल या मित्रराष्ट्रांमधील वादाने जागतिक तणाव अधिक वाढवला आहे.

बेंजामिन नेतान्याहू यांचा आक्रमक पवित्रा
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या शस्त्रसंधीनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना आक्रमक विधान केले आहे. "आमची काही लष्करी लक्ष्ये (Targets) अजूनही अपूर्ण आहेत आणि ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच, मग ते तडजोडीने असो किंवा युद्धाने," असे नेतान्याहू यांनी ठणकावून सांगितले आहे. अमेरिकेने इराणला कमकुवत केल्याचा दावा त्यांनी केला असला, तरी प्रत्यक्ष युद्धभूमीवरून मागे हटण्यास इस्रायल तयार नाही. नेतान्याहू यांच्या या विधानामुळे इराण-अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधी कागदावरच राहण्याची शक्यता निर्माण झाली असून, हा संघर्ष पुन्हा एकदा भीषण वळण घेऊ शकतो.

हेही वाचा – Donald Trump : इराणशी युद्धविरामानंतर ट्रम्प दुसरी आघाडी उघडणार? नाटोमधून बाहेर पडण्याची धमकी देत 'या' देशावर ताबा मिळवण्याचा पुनरुच्चार

लेबनॉनवर विनासूचना भीषण हवाई हल्ले
शस्त्रसंधी जाहीर झाल्याने लेबनॉनमधील नागरिकांना दिलासा मिळेल असे वाटत असतानाच, इस्रायलने बुधवारी दुपारी बेरुतमध्ये मोठा रक्तपात घडवून आणला. कोणतीही पूर्वसूचना न देता इस्रायलने मध्य बेरुतमधील व्यावसायिक आणि निवासी भागांवर हवाई हल्ले केले, ज्यामध्ये किमान 112 नागरिक ठार झाले. दिवसभरात संपूर्ण लेबनॉनमध्ये झालेल्या विविध हल्ल्यात मृतांचा आकडा 254 वर पोहोचल्याची माहिती नागरी संरक्षण विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात विस्थापित लोकांनी आश्रय घेतला होता, त्याच भागांना इस्रायलने लक्ष्य केल्याने जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

शस्त्रसंधी धोक्यात येण्याची चिन्हे
इराण आणि अमेरिका यांच्यात सुमारे 90 मिनिटे चाललेल्या चर्चेनंतर हा युद्धविराम झाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा करताना इस्रायलकडूनही हल्ले थांबवले जातील असे म्हटले होते, मात्र इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरू ठेवून या शस्त्रसंधीत खोडा घातला आहे. मित्रराष्ट्रांमधील हा अविश्वास आणि इस्रायलचा आक्रमक पवित्रा पाहता, दोन आठवड्यांचा हा शांतता काळ टिकण्याची शक्यता कमी दिसत आहे. इराण आता यावर काय प्रतिक्रिया देतो आणि अमेरिका इस्रायलवर कसा दबाव आणते, यावरच पश्चिम आशियाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

हेही वाचा – Iran After Ceasefire : 'अमेरिकेवर आमचा भरवसा नाही!'; इराणची मोठी अट, रशिया आणि चीनने सुरक्षेची हमी देण्याची मागणी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number