Gemini Security Breach: गुगलच्या ‘जेमिनी’ AI ने केली हॅकिंग; 3 कंपन्यांच्या सुरक्षित यंत्रणा भेदून मिळवले पासवर्ड्स

गुगलच्या 'जेमिनी' (Gemini) या AI मॉडेलशी संबंधित एका खळबळजनक घटनेने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

Gemini Security Breach: गुगलच्या ‘जेमिनी’ AI ने केली हॅकिंग; 3 कंपन्यांच्या सुरक्षित यंत्रणा भेदून मिळवले पासवर्ड्स

Gemini Security Breach: आजच्या काळात लोक माहिती शोधण्यासाठी पारंपरिक गुगल सर्चऐवजी 'ChatGPT' किंवा 'Gemini' सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहू लागले आहेत. मात्र, AI वरील या वाढत्या अवलंबित्वामुळे सायबर सुरक्षेबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुगलच्या 'जेमिनी' (Gemini) या AI मॉडेलशी संबंधित एका खळबळजनक घटनेने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. एका सायबर सुरक्षा चाचणीदरम्यान, जेमिनीने स्वतःहून इंटरनेटवरून माहिती शोधली आणि तीन कंपन्यांच्या सुरक्षित यंत्रणा भेदण्यात यश मिळवले. खुद्द गुगलनेच या घटनेला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे.

चाचणीदरम्यान घडला प्रकार 

रॉयटर्सच्या अहवालानुसार, मे महिन्यात एका सायबर सुरक्षा चाचणी कंपनीकडून जेमिनीच्या क्षमतेचे मूल्यांकन केले जात होते. AI मॉडेल सायबर सुरक्षेशी संबंधित कामे किती प्रभावीपणे करू शकते, हे तपासणे हा या चाचणीचा मुख्य उद्देश होता. परंतु, या प्रक्रियेदरम्यान जेमिनीने चाचणीचा भाग नसलेल्या बाह्य वेबसाइट्सना भेट दिली. गुगलच्या 'सिक्युरिटी इंजिनिअरिंग' विभागाच्या उपाध्यक्षा हेदर ॲडकिन्स यांनी स्पष्ट केले की, जेमिनीने सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहितीचा वापर केला आणि लॉगिन क्रेडेंशियल्सचा (युजरनेम व पासवर्ड) अंदाज लावून 3 वेबसाइट्सचा अनधिकृत ॲक्सेस मिळवला. या तीनही वेबसाइट्स चाचणीचाच भाग असल्याचा गैरसमज जेमिनीचा झाला होता.

पासवर्ड्स अन् पब्लिक कोडबेसचा वापर

'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या अहवालानुसार, तिन्ही यंत्रणांमध्ये प्रवेश करण्यासाठी जेमिनीने वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला. पहिल्या घटनेत, AI मॉडेलने वारंवार वेगवेगळ्या पासवर्ड्सचा अंदाज लावून यंत्रणेत प्रवेश मिळवला. तर उर्वरित 2 घटनांमध्ये, जेमिनीला 'पब्लिक कोडबेस'मध्ये (Public Codebase) लॉगिन क्रेडेंशियल्स सापडले. डेव्हलपर्सकडून कोड शेअर करताना चुकून राहिलेल्या संवेदनशील माहितीचा वापर करून जेमिनीने या यंत्रणा भेदल्या.

हेही वाचा – EPFO WhatsApp Service: EPFO ची कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठी भेट; आता व्हॉट्सॲपवर मिळणार PF ची संपूर्ण माहिती

गुगलकडून चाचणी प्रक्रियेत बदल

या घटनेनंतर गुगलने तत्काळ प्रभावित झालेल्या 3 संस्थांना माहिती दिली असून आपल्या चाचणी भागीदारासोबत  सहकार्य करून चाचणी प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. यापूर्वी 'Meta' आणि 'OpenAI' बाबतही 'Irregular' या सायबर सुरक्षा कंपनीच्या चाचणीदरम्यान अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. भविष्यात अशा AI मॉडेल्सचा गैरवापर कसा रोखायचा, हा मोठा आव्हानजनक प्रश्न आता निर्माण झाला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number