India-Pakistan Tension: भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा ताणले! श्रीलंकेला मदत पाठवण्यावरून नवीन वादंग

चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मोठा कहर झाला असून पूर, दरडी आणि इमारती कोसळण्याच्या घटनांनी व्यापक हानी केली आहे. आतापर्यंत 410 जणांचा मृत्यू झाला.

India-Pakistan Tension: भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा ताणले! श्रीलंकेला मदत पाठवण्यावरून नवीन वादंग

India-Pakistan Tension: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेला ताण अजून ओसरलेला नाही. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेतील नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या मानवी संकटावरून दोन्ही देशांमध्ये नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

श्रीलंकेत गंभीर आपत्ती, मोठ्या प्रमाणावर नुकसान

चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मोठा कहर झाला असून पूर, दरडी आणि इमारती कोसळण्याच्या घटनांनी व्यापक हानी केली आहे. आतापर्यंत 410 जणांचा मृत्यू झाला असून 336 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. या परिस्थितीत अनेक देशांनी श्रीलंकेसाठी मदतीचा हात पुढे केला असून पाकिस्ताननेही तातडीची मदत पाठवली आहे.

मदत-विमानाला भारताने अडवल्याचा पाकिस्तानचा आरोप

श्रीलंकेसाठी पाठवण्यात येणाऱ्या मानवतावादी मदत साहित्याने भरलेल्या पाकिस्तानच्या विमानाला भारताने हवाई मार्ग देण्यास नकार दिल्यामुळे 60 तास विलंब झाल्याचा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. त्यांच्या निवेदनानुसार, ‘भारत सतत असहकाराची भूमिका घेत आहे. हवाई मार्ग नाकारल्यामुळे मदत पोहोचण्यात मोठा अडथळा निर्माण झाला.’

हेही वाचा – Russia-Europe Relations : ‘तुम्हाला युद्ध हवं असेल तर आम्हीही..’, पुतिन यांचा युरोपला थेट इशारा

भारताचे सडेतोड उत्तर 

पाकिस्तानच्या दाव्याला भारताने तत्काळ प्रतिउत्तर दिले. भारतीय परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर निवेदन प्रसिद्ध करत पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘पाकिस्तानचा आरोप विनोदी आणि निराधार आहे. भारताची बदनामी करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे.’ 

हेही वाचा – USA Visa-Green Card Update : अमेरिकेचा वाढता दबाव! 19 वरून थेट 30 देशांना ट्रम्प प्रशासनाकडून धक्का; ग्रीन कार्ड आणि व्हिसावरही बंदी?

भारताकडून घटनाक्रम स्पष्ट

भारताने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या विमानाला भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करण्याची विनंती 1 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता भारतीय दूतावासाला मिळाली. परिस्थितीची गरज लक्षात घेऊन त्याच दिवशी सायंकाळी 5.30 वाजता ही परवानगी दिल्याचे भारताने स्पष्ट केले. भारताचे म्हणणे आहे की मदत उशिरा पोहोचण्यास भारत जबाबदार नाही.  निवेदनाच्या अखेरीस भारताने आश्वासन दिले की, ‘श्रीलंका कठीण प्रसंगातून जात असताना भारत सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number