Thursday, November 13, 2025 01:50:23 PM

New York Mayor Election: चित्रपट निर्माती मीरा नायरचा मुलगा न्यूयॉर्कचा महापौर! जोहरान ममदानी कोण आहेत?

न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या जोहरान ममदानींचा अभूतपूर्व विजय; ट्रम्प यांना जोरदार धक्का. सर्वात तरुण मुस्लीम महापौर म्हणून त्यांनी इतिहास रचला.

new york mayor election चित्रपट निर्माती मीरा नायरचा मुलगा न्यूयॉर्कचा महापौर जोहरान ममदानी कोण आहेत

New York Mayor Election: अमेरिकेतील सर्वात महत्त्वाच्या आणि प्रभावशाली शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्कच्या महापौर पदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम तरुणाची अभूतपूर्व निवड ही बातमी जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. जोहरान ममदानी या नावाने आज जागतिक पटलावर नवीन इतिहास लिहिला आहे. आणि या निकालाचा सर्वात मोठा राजकीय धक्का बसला आहे तो अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना. कारण ज्याच्यावर ट्रम्प यांनी सातत्याने टीका केली, ज्याची राजकीय विचारसरणी नाकारली तोच उमेदवार सर्वाधिक मतांनी विजयी होत महापौरपदी विराजमान झाला.

डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी घेतलेल्या ममदानी यांनी रिपब्लिकन पक्षाचे कर्टिस स्लिवा आणि अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांना मागे टाकत निर्णायक विजय मिळवला. निवडणुकीपूर्वीच्या सर्वेक्षणांमध्येही ममदानी यांच्याबाबत सकारात्मक वातावरण दिसत होतं, आणि अचूक तेच मतदान निकालातून स्पष्ट झालं.

हेही वाचा: Sunrisers Leeds : हंड्रेड लीगमध्ये मोठा बदल!; नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघ आता ओळखला जाणार 'या' नावानं

सर्वात तरुण आणि पहिला भारतीय वंशाचा मुस्लीम महापौर

ममदानी यांची निवड आणखी एका कारणामुळे ऐतिहासिक ठरली आहे. वयाच्या फक्त 34व्या वर्षी ते न्यूयॉर्कच्या गेल्या शतकातील सर्वात तरुण महापौर ठरले आहेत. याशिवाय ते न्यूयॉर्क शहरातील पहिल्यांदाच भारतीय वंशाचे आणि मुस्लीम समुदायातील महापौर झाले आहेत.

त्यांची पार्श्वभूमीही रंजक आहे:

  • ते प्रसिद्ध चित्रपट निर्माती मीरा नायर यांचे पुत्र

  • त्यांचा जन्म कंपाला, युगांडा

  • वयाच्या 7व्या वर्षी ते न्यूयॉर्कला स्थलांतरित

  • राजकारणात येण्यापूर्वी रॅपर म्हणून ओळख


हेही वाचा: America Plane Crash: अमेरिकेत लुईसविले विमानतळाजवळ UPS चे कार्गो विमान कोसळले; तीन जणांचा मृत्यू, अकरा जखमी

ट्रम्प यांच्यावर राजकीय पलटवार

या निकालामुळे ट्रम्प यांच्या राजकीय गृहितकांवर थेट प्रहार झाला असल्याची चर्चा अमेरिकन राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण प्रचाराच्या काळात ट्रम्प यांनी अनेकदा ममदानी यांच्याविरुद्ध वक्तव्ये केली होती. पण शेवटी मतदारांनी त्याच व्यक्तीला सर्वाधिक समर्थन देत ट्रम्प यांच्या विरोधातील भावनेलाच बळ दिलं.

न्यूयॉर्कच्या राजकारणाला नवे वळण 

न्यूयॉर्कसारख्या बहुसांस्कृतिक शहरात अल्पसंख्याक व तरुण नेतृत्वाला मिळालेला हा वाढता पाठिंबा अमेरिकेत राजकीय बदलाचा नवा टप्पा सुरू झाल्याचे चिन्ह मानलं जात आहे. भारतीय वंश, मुस्लिम समुदाय आणि तरुण नेतृत्व या तीनही घटकांना वेगळा दर्जा देत न्यूयॉर्कवासीयांनी जागतिक संदेश दिला आहे की विविधतेलाच खरा मान्यता मिळणार.

 


सम्बन्धित सामग्री