Iran Cluster Bomb Attack on Israel : इराणचा इस्रायलवर क्लस्टर बॉम्ब हल्ला, 15 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू आणि…

रविवारी रात्री इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीवसह अनेक शहरांवर क्लस्टर बॉम्ब टाकले.

Iran Cluster Bomb Attack on Israel : इराणचा इस्रायलवर क्लस्टर बॉम्ब हल्ला, 15 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू आणि…

आज अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा 24 वा दिवस आहे. रविवारी रात्री इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीवसह अनेक शहरांवर क्लस्टर बॉम्ब टाकले. या हल्ल्यात सुमारे १५ जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. अनेक घरे आणि रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. इस्रायलनेही सोमवारी इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र हल्ले केले.

दरम्यान, इराणचे अध्यक्ष मसूद पझाकियान यांनी म्हटले आहे की, कोणत्याही हल्ल्याला जमिनीवरून प्रत्युत्तर दिले जाईल. जर इराणच्या अणुसुविधांना लक्ष्य केले गेले, तर त्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद होऊ शकते, ज्याचा जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होईल.

हेही वाचा – Petrol-Diesel Rate Today : आता बिनधास्त टाकीच्या गाड्या करा फुल्ल! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण, महाराष्ट्रासह…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीम इराणसोबत युद्धविरामासाठी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहे. अॅक्सिऑस न्यूजच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांचे सल्लागार जेरेड कुशनर आणि स्टीव्ह विटकॉफ हे देखील या प्रयत्नात सहभागी आहेत. मात्र, इराणने चर्चेसाठी काही अटी ठेवल्या आहेत: युद्ध थांबवणे आणि झालेल्या नुकसानीची भरपाई. भविष्यात पुन्हा हल्ला होणार नाही याची ठोस हमी मिळावी, अशीही इराणची मागणी आहे.  

हेही वाचा –Vidhan Parishad : उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हेंसह नऊ सदस्य होणार निवृत्त, जाणून घ्या 

२८ फेब्रुवारी २०२६, इराण युद्धाचा पहिला दिवस होता. अमेरिका आणि इस्रायलने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह इराणच्या अनेक बड्या नेत्यांना ठार केले. पहिल्या १०० तासांत ५०,००० कोटी रुपयांचे बॉम्ब टाकण्यात आले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number