Iran Tease Donald Trump: आता इराण काय ऐकेना! ‘आम्हाला करमेना, आता काहीतरी बोला…’, म्हणत थेट ट्रम्प यांना डिवचलं

वाढत्या संघर्षामुळे मध्य पूर्वेतील तणाव तीव्र झाला असून पाकिस्तानमार्फत होणारी मध्यस्थीही अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

Iran Tease Donald Trump: आता इराण काय ऐकेना! ‘आम्हाला करमेना, आता काहीतरी बोला…’, म्हणत थेट ट्रम्प यांना डिवचलं

इराण: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अधिकच तीव्र झाला आहे. गेल्या 24 तासांत इराणने अमेरिकेच्या दोन लढाऊ विमानांसह एक मोठे विमान आणि काही हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. या घडामोडींनंतर इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवत, “ट्रम्प, काहीतरी बोला, आम्हाला करमेना,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे.

ही पोस्ट झिम्बाब्वेतील इराणी दूतावासाने सोशल मीडियावर शेअर केली असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चांना उधाण आले आहे. इराणने दावा केला आहे की त्यांनी अमेरिकेच्या एमक्यू-9 ड्रोनसह क्रूझ क्षेपणास्त्रांनाही निष्क्रिय केले आहे. या आक्रमक कारवाईमुळे अमेरिकन लष्कराला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी अलीकडेच इराणची क्षेपणास्त्र क्षमता जवळपास संपुष्टात आल्याचा दावा केला होता. मात्र, इराणच्या ताज्या हल्ल्यांमुळे हा दावा फोल ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. इराणकडून इस्रायलच्या तेल अवीवसह मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांवर सातत्याने हल्ले सुरू असल्याचेही समोर येत आहे.

काल झालेल्या एका हल्ल्यात अमेरिकेचे एक लढाऊ विमान कोसळले असून त्यातील वैमानिक अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

हेही वाचा: Rohit Pawar On Ashok Kharat: ‘हवाला, दुबई कनेक्शन अन् भ्रष्ट नेते…’; खरात प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

याचदरम्यान, मध्यस्थीच्या प्रयत्नांनाही मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान मार्फत पाठवलेल्या प्रस्तावाला इराणने स्पष्ट नकार दिला आहे. ट्रम्प यांच्या अटी मान्य करण्यास नकार देत इराणने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या संभाव्य बैठकीलाही नकार दर्शवला आहे.

मात्र, या सर्व घडामोडींवर पाकिस्तानने सावध भूमिका घेतली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते ताहिर अंदराबी यांनी अशा प्रकारच्या बातम्या “खोट्या” आणि “कल्पनारम्य” असल्याचे सांगत त्या फेटाळून लावल्या आहेत.

सध्याच्या परिस्थितीत अमेरिका-इराण संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता असून, मध्य पूर्वेतील तणाव लवकर निवळण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. त्यामुळे जागतिक पातळीवर या संघर्षाचे परिणाम अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: Khushboo Patani Supports Raghav Chadha: राघव चड्ढा यांची ‘आप’मध्ये कोंडी? दिशा पटानीच्या बहिणीने दिला सल्ला; म्हणाली, ‘स्वतःचा पक्ष…’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number