अमेरिकेला इराणकडून मोठा दणका! होर्मुज खाडीतील स्फोटात 20 लाख बॅरल्स तेलवाहू जहाज भस्मसात; जागतिक तेलाचा पुरवठा धोक्यात

आताची परिस्थिती पाहता होर्मुज खाडी ही केवळ दोन देशांतील युद्धाचे मैदान राहिलेली नसून ती जागतिक अर्थव्यवस्थेची नाडी बनली आहे.
Trump Mojtaba
Trump Mojtaba

Strait of Hormuz Oil Tanker Blast: अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्ष आता अत्यंत टोकाच्या टप्प्यावर पोहोचला असून अमेरिकेत निवडणुका तोंडावर असतानाच होर्मुज खाडीत (Strait of Hormuz) एक खळबळजनक घटना घडली आहे. अमेरिकेच्या सुरक्षेच्या दाव्यांना मोठा हरताळ फासत ओमानच्या दक्षिण सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका अवाढव्य तेलवाहू जहाजाची नेव्हल माइन म्हणजेच पाण्याखालील सुरुंगाशी जोरदार धडक झाली. या भीषण स्फोटानंतर जहाजाला भीषण आग लागली आणि संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या दुर्दैवी जहाजातून सौदी अरेबियाचे तब्बल 20 लाख बॅरल्स कच्चे तेल वाहून नेले जात असतानाच हा भयंकर अपघात घडला.

इराणचे होर्मुज खाडीवर पूर्ण नियंत्रण; कच्च्या तेलाच्या किमतीत भडका

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर लष्करी हल्ले सुरू केल्यानंतर इराणने रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला होर्मुज खाडीचा सागरी मार्ग तात्काळ बंद केला होता. या मार्गावर इराणचे पूर्ण वर्चस्व असल्याने आणि इराणने मार्ग रोखल्यामुळे जगभरातील कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. परिणामी, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असून अर्थव्यवस्था अस्थिर झाली आहे. भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा याच मार्गाने येत असल्याने भारतीय जहाजांवरही या युद्धादरम्यान हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे.

सागरी मार्गाचे संरक्षण करण्यात अमेरिका अपयशी
अमेरिकेने होर्मुज खाडीवर आपले नियंत्रण असल्याचे सांगत या मार्गावरून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय जहाजांना पूर्ण संरक्षण देण्याचे दावे केले होते, परंतु प्रत्यक्षात अमेरिकेचे हे प्रयत्न सपशेल अपयशी ठरले आहेत. अलिकडेच अर्धा डझनहून अधिक व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्याचा अधिकृत दावा इराणकडून करण्यात आला आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या व्यापारी जहाजांनाही आता या मार्गावरून प्रवास करणे अशक्यप्राय झाले असून सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण सागरी वाहतूक ठप्प झाली आहे.

हेही वाचा – आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण हल्ला; 12 जण ठार तर 300 हून अधिक जण गंभीर जखमी

अटी मान्य होईपर्यंत मार्ग बंदच ठेवण्यावर इराण ठाम
इराणने अमेरिकेसमोर काही कडक अटी ठेवल्या असून जोपर्यंत या अटी पूर्णपणे मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत होर्मुज खाडीतील प्रवासाला सुरक्षितता दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. इराणने हिरवा कंदील दिल्याशिवाय या मार्गावरून कोणतेही जहाज सुरक्षितपणे जाऊ शकत नाही, हेच या ताज्या सुरुंग स्फोटावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अमेरिकेला इराणसमोर नमते घ्यावे लागते की, संघर्ष आणखी पेटतो, यावर जागतिक इंधन पुरवठ्याचे भविष्य अवलंबून असणार आहे.

जागतिक बाजारात चिंतेचे सावट; संघर्षाचे भीषण परिणाम
आताची परिस्थिती पाहता होर्मुज खाडी ही केवळ दोन देशांतील युद्धाचे मैदान राहिलेली नसून ती जागतिक अर्थव्यवस्थेची नाडी बनली आहे. 20 लाख बॅरल्स तेलाच्या जहाजावर झालेल्या या स्फोटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चिंतेची लाट पसरली आहे. अमेरिकेला बसलेल्या या मोठ्या दणक्यामुळे आता जागतिक समुदाय या संघर्षावर काय तोडगा काढतो आणि इंधन तुटवड्यातून जगाची कशी सुटका होते, याकडे सर्व राष्ट्रांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं! भारतीय वंशाच्या नवी पिल्ले यांना मिळाला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version