US Iran Israel War: सावधान! इराण युद्ध 40 दिवसांच्या पुढे गेलं जेवणच महागणार; FAO कडून जगाला गंभीर इशारा

सध्या जगभरात धान्याचा पुरेसा पुरवठा असला तरी, युद्धाचा कालावधी 40 दिवसांच्या पुढे जाणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक ठरेल.

US Iran Israel War: सावधान! इराण युद्ध 40 दिवसांच्या पुढे गेलं जेवणच महागणार; FAO कडून जगाला गंभीर इशारा

US Iran Israel War : इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता महिना उलटला असून, त्याचे परिणाम जागतिक बाजारपेठेवर स्पष्टपणे दिसू लागले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या 'फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन'ने (FAO) धोक्याचा इशारा दिला आहे की, जर हे युद्ध आगामी 40 दिवसांपेक्षा जास्त काळ सुरू राहिले, तर जगासमोर अन्नाचे भीषण संकट उभे राहू शकते. मार्च महिन्यात जागतिक स्तरावर खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, ही पातळी गेल्या वर्षीच्या सप्टेंबरनंतरचा सर्वोच्च ठरला आहे.

कच्च्या तेलाचा आणि खतांचा दुहेरी फटका
या महागाईचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे आहे. FAOचे मुख्य अर्थतज्ज्ञ मॅक्सिमो तोरेरो यांच्या मते, तेलाचे दर वाढल्यामुळे खतांच्या उत्पादनावर आणि किमतीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे उद्भवू शकणारी परिस्थिती खालीलप्रमाणे असू शकते:
– खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी पेरणीचे क्षेत्र कमी करू शकतात.
– ज्या पिकांसाठी खते कमी लागतात, अशा पर्यायी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढू शकतो.
– यामुळे भविष्यातील अन्नपुरवठा साखळी विसकळीत होऊन किमतीत प्रचंड तेजी येऊ शकते.

हेही वाचा – Strait of Hormuz: जागतिक व्यापाराचा मार्ग मोकळा! इराणने 'होर्मुझ सामुद्रधुनी'बाबत घेतला मोठा निर्णय; भारतासह जगाला दिलासा

मार्च महिन्यात कोणत्या वस्तू किती महागल्या?
जागतिक 'फूड प्राईस इंडेक्स'मध्ये फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये 2.4 टक्के वाढ झाली आहे. हा निर्देशांक गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 टक्का जास्त आहे. विविध घटकांमधील वाढ खालीलप्रमाणे आहे:
गहू: आंतरराष्ट्रीय स्तरावर गव्हाच्या किमतीत 4.3 टक्के वाढ झाली आहे. अमेरिकेतील खराब हवामान आणि ऑस्ट्रेलियातील कमी पेरणी ही याची मुख्य कारणे आहेत.
खाद्यतेल: वनस्पती तेलाच्या किमतीत 5.1 टक्के वाढ झाली असून पाम तेल 2022 नंतरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहे.
साखर: साखरेच्या दरात मार्चमध्ये 7.2 टक्के इतकी मोठी वाढ झाली आहे. जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ब्राझील आता साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीवर भर देऊ शकतो, ज्यामुळे साखरेचा तुटवडा जाणवू शकतो.
मांस आणि तांदूळ: मार्चमध्ये मीटच्या किमती 1 टक्क्याने वाढल्या आहेत, तर मागणी कमी असल्यामुळे तांदळाच्या किमतीत मात्र 3 टक्के घट झाली आहे.

40 दिवसांचा 'डेडलाईन' इशारा
सध्या जगभरात धान्याचा पुरेसा पुरवठा असला तरी, युद्धाचा कालावधी 40 दिवसांच्या पुढे जाणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक ठरेल. जर कच्च्या मालाच्या किमती वाढलेल्याच राहिल्या, तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होईल. विशेषतः ब्राझीलसारख्या देशांनी तेलाच्या किमतींमुळे इंधनाकडे (इथेनॉल) मोर्चा वळवला, तर साखरेसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकतात.

हेही वाचा – Pakistan Economic Crisis: पाकिस्तान कंगाल होणार? UAE ने मागितलं 29 वर्षांपासून थकलेलं 3.5 अब्ज डॉलर्सचं कर्ज

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number