पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (9 ऑक्टोबर 2025) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे गाझा शांतता योजनेतील प्रगतीबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी आणि नेतान्याहू यांच्यातील ही चर्चा अशा वेळी झाली आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी याच मुद्द्यावर चर्चा केली होती आणि गाझा युद्ध थांबवण्यासाठी त्यांच्या प्रस्तावित गाझा शांतता योजनेबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते.
तथापि, गाझा शांतता योजनेवर पंतप्रधान मोदींशी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नेतन्याहू यांनी त्यांची सुरक्षा मंत्रिमंडळ बैठक काही काळासाठी पुढे ढकलल्याचेही समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली.
हेही वाचा - Israel-Hamas Ceasefire: गाझा युद्धबंदी करारानंतर नेतन्याहू यांची मोठी घोषणा! म्हणाले, '24 तासांत...'
पंतप्रधान मोदी म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीबद्दल अभिनंदन करण्यासाठी मी माझे मित्र पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना फोन केला. ओलिसांच्या सुटकेबाबत आणि गाझाच्या लोकांसाठी वाढीव मानवतावादी मदतीबाबतच्या कराराचे आम्ही स्वागत करतो.आम्ही हे देखील पुनरुच्चार केले की दहशतवाद कोणत्याही स्वरूपात किंवा कुठेही स्वीकार्य नाही".
हेही वाचा - UK PM On Aadhaar System : ब्रिटनमध्येही सुरु होणार आधारसारखी डिजिटल ओळख प्रणाली; पंतप्रधान स्टारमरनं दिली माहिती, म्हणाले...
टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने या संदर्भात एक निवेदनही जारी केले. इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींशी बोलण्यासाठी गाझा युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेच्या कराराबाबत सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक थोडक्यात थांबवली. निवेदनात म्हटले आहे की, "सर्व ओलिसांच्या सुटकेसाठी झालेल्या कराराबद्दल पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान नेतन्याहू यांचे अभिनंदन केले. नेतन्याहू नेहमीच भारताचे जवळचे मित्र राहिले आहेत आणि ही मैत्री भविष्यातही मजबूत राहील यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला."