Jaish-e-Mohammed First Women’s Wing: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांच्या हत्येनंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आता नवीन रणनीती वापरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संघटनेने 2024 पासून 'जमात अल-मुमिनत' नावाची महिला ब्रिगेड तयार केली आहे. ही महिला ब्रिगेड महिलांना ब्रेनवॉश करून त्यांच्या नेटवर्कमध्ये सामील करण्यावर लक्ष केंद्रित करते. ही ब्रिगेड जैशच्या महिला शाखेच्या रूपात कार्यरत असून मानसिक युद्ध, प्रचार आणि जमिनीवर भरती करण्याचे काम करते. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आणि संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेला दहशतवादी मौलाना मसूद अझहर यांच्या नावाने जारी केलेल्या पत्राद्वारे ही कारवाई उघड झाली आहे. या संघटनेचे नेतृत्व सादिया अझहर करणार आहे, जी मसूद अझहरची बहीण आहे. 7 मे रोजी भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मदच्या मरकझ सुभानल्लाह तळावर केलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तिचा पती युसूफ अझहर मारला गेला होता.
या गटाचे नेटवर्क जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये ऑनलाइन सक्रिय आहे. सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि काही मदरशांद्वारे ही महिला ब्रिगेड महिलांना धर्माच्या नावाखाली फसवते आणि संघटनेसाठी वापरते. गुप्तचर संस्थांच्या मते, या परिपत्रकात मक्का-मदीना प्रतिमा आणि सुशिक्षित शहरी मुस्लिम महिलांना प्रभावित करण्यासाठी भावनिक सामग्री देखील समाविष्ट आहे.
हेही वाचा - US Tariff: अमेरिकेकडून भारतासाठी आनंदाची बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ निर्णयावर घेतला यू-टर्न
'जमात अल-मुमिनत' महिलांना आवाहन करून त्यांना संघटनेच्या उद्दिष्टांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. हा गट सेल-आधारित रचनेवर काम करतो, ज्यामध्ये लहान गट सोशल मीडिया किंवा मदरशांद्वारे भरती, निधी उभारणी आणि संदेश प्रसारित करतात. गुप्तचर संस्थांनी या ब्रिगेडच्या पाकिस्तानी संबंधाचे ठोस पुरावेही सापडल्याचे सांगितले आहे.
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम-
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मे 2025 मध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी अड्डे नष्ट केले, ज्यात जेईएमचे मुख्यालयही समाविष्ट होते. या ऑपरेशनमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले. हताश झालेल्या जैश-ए-मोहम्मदने आता महिलांना ढाल म्हणून वापरून भारताविरुद्ध नवीन कट रचण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - UK PM On Aadhaar System : ब्रिटनमध्येही सुरु होणार आधारसारखी डिजिटल ओळख प्रणाली; पंतप्रधान स्टारमरनं दिली माहिती, म्हणाले...
गुप्तचर संस्थांचे निरीक्षण -
भारताच्या सर्जिकल स्ट्राईक आणि ऑपरेशन्समुळे जैशच्या रणनीती बदलल्या असून, प्रत्येक हालचालीवर गुप्तचर संस्था बारकाईने लक्ष ठेवत आहेत. ही महिला ब्रिगेड देशातील सुरक्षा व्यवस्थेसाठी नवीन आव्हान ठरू शकते. त्यामुळे योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे.