Sunday, November 16, 2025 05:00:14 PM

JeM Online Course: महिलांच्या भरतीसाठी जैश-ए-मोहम्मदकडून ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू; मसूद अझहरच्या बहिणींच्या नेतृत्वाखाली देण्यात येतयं प्रशिक्षण

8 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या कोर्समध्ये, मसूद अझहर आणि जैशच्या इतर शीर्ष नेत्यांच्या कुटुंबातील महिला भरती प्रशिक्षक म्हणून सहभाग घेणार आहेत.

jem online course महिलांच्या भरतीसाठी जैश-ए-मोहम्मदकडून ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू मसूद अझहरच्या बहिणींच्या नेतृत्वाखाली देण्यात येतयं प्रशिक्षण

JeM Online Course: पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) ने त्यांच्या महिला ब्रिगेड 'जमात उल-मुमिनत' साठी लोकभरती आणि निधी उभारणीसाठी 'तुफत अल-मुमिनत' नावाचा ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला आहे. इंडिया टीव्हीने मिळवलेल्या कागदपत्रांनुसार या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश संघटनेला बळकट करणे आणि महिलांची सक्रिय भरती करणे आहे. 8 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या कोर्समध्ये, मसूद अझहर आणि जैशच्या इतर शीर्ष नेत्यांच्या कुटुंबातील महिला भरती प्रशिक्षक म्हणून सहभाग घेणार आहेत. दस्तऐवजांनुसार, अझहरच्या बहिणी सादिया अझहर आणि समायरा अझहर दररोज 40 मिनिटांचे वर्ग घेतील आणि महिलांना जिहाद, धर्म आणि इस्लामच्या दृष्टीने कर्तव्ये याबाबत प्रशिक्षण देतील.

हेही वाचा - North Korea Launches Ballistic Missile: ट्रम्प यांच्या दक्षिण कोरिया भेटीपूर्वी उत्तर कोरियाने केली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी

अभ्यासक्रमात सामील होणाऱ्या प्रत्येक महिलेकडून 500 पाकिस्तानी रुपये देणगी घेतली जात असल्याचे कागदपत्रात नमूद आहे, तसेच सहभागींना ऑनलाइन माहिती फॉर्म भरण्यास भाग पाडले जात आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, यामुळे पाकिस्तानमधील दहशतवादाच्या आर्थिक वाहतुकीचे स्पष्ट उदाहरण समोर येते. जैशने 8 ऑक्टोबर रोजी महिला ब्रिगेड 'जमात उल-मुमिनत' स्थापन केली, तर 19 ऑक्टोबरला पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोट येथे 'दुख्तरन-ए-इस्लाम' नावाचा कार्यक्रम आयोजित करून महिलांची भरती केली गेली. 

हेही वाचा - PM Modi And Donald Trump Call : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची फोनवर चर्चा ; काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष?

प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानमधील सामाजिक रूढीमुळे महिलांना बाहेर जाणे आव्हानात्मक असल्याने, जैश आता ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून महिलांना सक्रिय बनवत आहे. सुरक्षाव्यवस्थेच्या मते, जैश ही महिला ब्रिगेड आत्मघाती हल्ले करण्यासाठी प्रशिक्षण देऊ शकते, ज्यामुळे संघटनेचे धोके वाढले आहेत. अझहरने या ब्रिगेडची कमांड आपल्या धाकटी बहिणी सादिया अझहर हिला दिली आहे. यामध्ये अजहरच्या इतर नातेवाईकांचा, तसेच पुलवामा हल्ल्यात सहभागी झालेल्या उमर फारूकची पत्नी आफ्रिरा फारूक यांचा सहभागही असल्याचे सांगितले जात आहे. या नव्या ऑनलाइन भरती मोहिमेने जागतिक सुरक्षा तज्ज्ञांचे लक्ष वेधले असून, भारतीय व आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा यावर कडक नजर ठेवत आहेत.


सम्बन्धित सामग्री