Friday, April 25, 2025 09:18:03 PM

सुनिता विल्यम्सने गणपती बाप्पाची मूर्ती सोबत नेली होती! चुलत बहिणीने सांगितलं, सुनिता आहे भारतीय खाद्यपदार्थांचीही चाहती

सुनिताने तिच्यासोबत गणेशमूर्ती कशी आंतररराष्ट्रीय स्पेस स्टेशनला (ISS) नेली आणि तिच्या संपूर्ण प्रवासात ती तिच्यासोबत कशी ठेवली हे तिने सांगितले.

सुनिता विल्यम्सने गणपती बाप्पाची मूर्ती सोबत नेली होती चुलत बहिणीने सांगितलं सुनिता आहे भारतीय खाद्यपदार्थांचीही चाहती

Sunita Williams Cousin : सुनिता विल्यम्सच्या परतण्याबद्दल त्यांची चुलत बहीण फाल्गुनी पंड्या यांनी उत्साह व्यक्त केला. त्यांच्या कुटुंबाने सुनिता सुखरूपणे परतल्याच्या आनंदानिमित्त मंदिरात विशेष प्रार्थना आणि हवन करण्याचे ठरवले आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची चुलत बहीण फाल्गुनी पंड्या यांनी मंगळवारी अंतराळवीराच्या तिच्या भारतीय संस्कृतीशी असलेल्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले.

सुनिताने तिच्यासोबत गणेशमूर्ती कशी आंतररराष्ट्रीय स्पेस स्टेशनला (ISS) नेली आणि तिच्या संपूर्ण प्रवासात ती तिच्यासोबत कशी ठेवली हे तिने सांगितले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नऊ महिन्यांहून अधिक काळ घालवलेल्या सुनिता आता सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर आणि इतर दोन क्रू सदस्यांसह पृथ्वीवर परतत आहेत.

हेही वाचा - Sunita Williams : नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर कशी आहे सुनिता विल्यम्सची तब्येत? जाणून घेऊ सर्व माहिती..

पंड्या यांनी विल्यम्सच्या परतण्याबद्दल उत्साह व्यक्त केला, कुटुंबाने तिच्या परतीच्या निमित्त मंदिरात विशेष प्रार्थना आणि हवन करण्याची योजना आखली आहे असे सांगितले. “आम्ही तिच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. आम्ही उत्सव साजरा करण्यासाठी मंदिरात विशेष प्रार्थना आणि हवन करण्याची योजना आखली आहे,” असं पंड्या म्हणाल्या.

त्यांनी असेही सांगितले की, सुनिताने आंतररराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर अवकाशात तरंगणाऱ्या गणेश मूर्तीचा एक फोटो शेअर केला होता. पंड्याने सुनिताच्या भारतीय जेवणावरील प्रेमाबद्दल सांगितले आणि ती पृथ्वीवर परतल्यानंतर भारताला भेट देण्याची योजना आखत असल्याचेही त्या म्हणाल्या. "सुनीताला भारतीय जेवण आवडते, ती परतल्यानंतर आपण पुन्हा भारताला भेट देऊ," असं त्या म्हणाल्या.

पांड्या यांनी फेब्रुवारीमध्ये झालेल्या कुंभमेळ्यासाठी भारताला दिलेल्या त्यांच्या भेटीची आठवण सांगितली. यावर त्या वेळेस अंतराळात असणारी सुनिताही फिदा झाली होती आणि उत्सवाबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक होती, असं त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे, सुनिताने कुंभमेळ्याचा अंतराळातून काढलेला एक फोटोही पाठवला. "जेव्हा मी तिच्यासोबत कुंभमेळ्याचे माझे फोटो शेअर केले तेव्हा तिने मला अंतराळातून काढलेला एक फोटो पाठवला. तो कुंभमेळ्याचा एक खूप छान फोटो होता," असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा - 'Welcome Home Sunita Williams..!' सुनिता विल्यम्स सुखरूप घरी परतल्या.. असा होता 17 तासांचा थरारक प्रवास

पंड्या यांनी असेही नमूद केले की सुनिता आणि त्यांचे वडील 2007 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना भेटले होते आणि नंतर अमेरिकेतही भेटले होते. "सुनीता ही गुजरातची मुलगी असून आम्हाला तिचा अभिमान आहे आणि तिचे गाव झुलासन तिच्या परतीचा उत्सव साजरा करत आहे," असं पंड्या म्हणाल्या.

सुनिताच्या वडिलांचे मूळ गाव झुलासन येथे असून तेथील रहिवासी तिच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत आणि तिच्या अंतराळात जाण्यापासून 'अखंड ज्योत' (शाश्वत ज्योत) तेवत ठेवली आहे. ती सुरक्षित परत येईपर्यंत ही ज्योत तेवत राहील. तिच्या सन्मानार्थ प्रार्थना जप आणि आतषबाजीसह एक  तिच्या फोटोची भव्य मिरवणूक आयोजित करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री