Friday, April 25, 2025 09:07:02 PM

Sunita Williams : नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर कशी आहे सुनिता विल्यम्सची तब्येत? जाणून घेऊ सर्व माहिती..

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले होते. त्यांना अंतराळयानातून सुरक्षितपणे बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.

sunita williams  नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर कशी आहे सुनिता विल्यम्सची तब्येत जाणून घेऊ सर्व माहिती

Sunita Williams Return to Earth : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर नऊ महिन्यांनंतर अंतराळातून सुखरूप परतले आहेत. नासा आणि स्पेसएक्सने मिळून ही मोहीम यशस्वी केली. आज पहाटे नासा आणि spaceX चं कॅप्सूल फ्लोरिडा किनाऱ्यावर उतरल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात सर्व अंतराळवीर निरोगी आढळले.

नासाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी यांच्या पुनरागमनाची वाट पाहणाऱ्या सर्वांच्या आज जिवात जीव आला. नासाचे अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. केवळ 8 दिवसांसाठी अंतराळात गेलेले हे अंतराळवीर तब्बल 9 महिन्यांच्या विलंबानंतर पृथ्वीवर परतले.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून रवाना झाल्यानंतर साधारण 17 तासांनी, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारं स्पेसएक्स कॅप्सूल पॅराशूटने पृथ्वीवर उतरलं. फ्लोरिडा पॅनहँडलमध्ये टाल्लाहसीच्या किनारपट्टीवर स्प्लॅशडाउन झाला. लँड झाल्यानंतर तासाभरात हे अंतराळवीर त्यांच्या कॅप्सूलमधून बाहेर आले आणि त्यांनी हसऱ्या चेहऱ्यांनी कॅमेऱ्यांसमोर सर्वांना अभिवादन केले. यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून नियमित वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.

नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांची तब्येत कशी आहे, सर्व अंतराळवीर सुरक्षित आहेत का? इतके दिवस अंतराळात राहिल्यानंतर मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतात, असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. चला, याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

हेही वाचा - 'Welcome Home Sunita Williams..!' सुनिता विल्यम्स सुखरूप घरी परतल्या.. असा होता 17 तासांचा थरारक प्रवास

सुनिता विल्यम्स-बुच विल्मोरचे यशस्वी पुनरागमन
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर आणण्यासाठी, NASA आणि SpaceX ने Falcon 9 रॉकेट वापरून 13 मार्च रोजी क्रू-10 मोहीम सुरू केली. SpaceX चे ड्रॅगन अंतराळयान Falcon-9 रॉकेट शुक्रवारी संध्याकाळी (स्थानिक वेळेनुसार) फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात आले. याच मिशनअंतर्गत दोघेही मायभूमीवर परतले.

खरंतर, सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी पृथ्वीवर परतण्यास जसजसा विलंब होत होता, तससशी सर्वांच्या मनातली धाकधूक वाढत होती. हे दोघे पृथ्वीवर परततील की नाही, याविषयी शंकाही वाटू लागली होती. मात्र, इतके महिने या दोघांचा जीव वाचवून त्यांना सुखरूपपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये घालवावे लागले.

NASA-SpaceX च्या क्रू-10 मिशनने आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) वर उपस्थित क्रू-9 ची जागा घेतली. NASA आणि SpaceX ने Falcon 9 रॉकेटद्वारे सुरू केलेल्या क्रू-10 मिशनमध्ये चार नवीन अंतराळवीर अंतराळयानात गेले. त्या चौघांनी सुनिता विल्यम्स, बुच विल्मोर आणि इतर दोघांची जागा घेतली.

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले होते. त्यांनी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून केवळ आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) उड्डाण केलं होतं, पण स्टारलायनरमधील तांत्रिक बिघाडामुळे ते पृथ्वीवर परतू शकले नाहीत. आता 9 महिन्यांनी त्यांच्या मायभूमीवर परतल्यानंतर जणू त्यांचा हा दुसरा जन्मच आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत.

या यानातून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासोबत आणखी दोन अंतराळवीरही पृथ्वीवर उतरले आहेत. अंतराळवीरांना ड्रॅगन अंतराळयानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. ड्रॅगन फ्रीडमला कॅप्सूल हे पाण्यातून बाहेर काढून रिकव्हरी व्हेसलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर तेथील डॉक्टरांच्या पथकाने अंतराळवीरांची कसून आरोग्य तपासणी केली. सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीर सुरक्षित आणि पूर्णपणे ठीक आहेत, अशी माहिती नासातर्फ देण्यात आली.

सुनीता विल्यम्स दीर्घकाळानंतर या अवकाशातून पृथ्वीवर परतल्या आहेत. अशा स्थितीत अंतराळात असलेल्या शून्य गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या शरीरातील स्नायू आणि हाडे कमकुवत झालेली असू शकतात. त्यामुळे पृथ्वीवर परतल्यावर त्यांना गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यास थोडा वेळ लागेल. त्यांना पृथ्वीवर राहण्यासाठी अनुकूल वाटावे यासाठी प्रथम डॉक्टरांची एक टीम त्यांच्या आरोग्याची कसून तपासणी करेल. त्यांना स्ट्रेचरवर नेण्यात आलं. हृदय, रक्तदाब, दृष्टी, स्नायूंची स्थिती, सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या जातील. तसेच त्यांनी मानसिक स्थिती कशी आहे याचीही तपासणी होईल, तोपर्यंत त्यांना कोणालाही भेटता येणार नाही.

हेही वाचा - गरिबीत जगणाऱ्या आजीबाईंचं 'गडगंज' मृत्युपत्र वाचून शेजाऱ्यांना बसला धक्का, होत्या इतक्या कोटींच्या संपत्तीच्या मालकीण!

सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना भेटण्यासाठी कुटुंबालाही बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. ते अंतराळात असताना त्यांच्या कुटुंबांसाठी हा कठीण काळ होता. अंतराळात अडकून पडल्यामुळे बुच विल्मोर हे हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या त्यांच्या लहान मुलीसोबत राहू शकले नाहीत, तर सुनिता विल्यम्सना फक्त इंटरनेट कॉलद्वारे तिच्या कुटुंबाशी संवाद साधावा लागला होता.

सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीपर परतल्यावर भारतापासून अमेरिकेत तसेच जगभरातही जल्लोष सुरू आहे. हा भारत आणि संपूर्ण जगासाठी अभिमानाचा, अभिमानाचा आणि दिलासा देणारा क्षण असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद केलं. केले. त्याच्या सुरक्षित परतीसाठी अमेरिकेतील 21 हिंदू मंदिरांमध्ये प्रार्थना करण्यात आली. विल्यम्सचा भारतीय आणि स्लोवेनियन वारसा पाहता अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, असे विश्व हिंदू परिषदेचे अमेरिकेचे अध्यक्ष तेजल शाह यांनी सांगित नमूद केलं. तसेच बुच विल्मोर यांच्यासाठी चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली होती.


सम्बन्धित सामग्री