98 Years Old Poor Lady's Last 'Will' : इंग्लंडमध्ये निर्वासित म्हणून आलेल्या एका आजीबाईंचं वयाच्या 98 व्या वर्षी निधन झालं. यानंतर त्यांचं मृत्यूपत्र गावकऱ्यांच्या समोर आलं. ते पाहून सर्वांना मोठा धक्का बसला. या आजीबाईंचा कोणीच जवळचा नातेवाईक नव्हता. त्यांनी त्यांची संपत्ती मित्रांना भेट दिली आणि रुग्णालयांना दान म्हणून वाटली.
98 वर्षीय हिल्डा लेवी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारशाविषयी धक्कादायक खुलासा झाला. त्या इंग्लंडच्या केंटमध्ये रहात होत्या. 2022 त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अत्यंत साध्या घरातून 16 कोटी रुपयांची संपत्ती सापडली. त्यांनी ही संपत्ती वयस्कर लोकांना, रुग्णालयांना आणि दानधर्मासाठी वाटली होती. त्या जर्मनीहून 1930 मध्ये इंग्लंडला निर्वासित म्हणून आल्या होत्या. हिल्डा यांच्या कुटुंबीयांचा होलोकॉस्टमध्ये म्हणजेच नाझी जर्मनीच्या छळछावणीमध्ये मृत्यू झाला होता. या काळात नाझी जर्मनीत हिटलरने या छळछावण्यांमध्ये युरोपमधील असंख्य ज्यूंची हत्या घडवून आणली होती.
हेही वाचा - इजिप्तमधील मंदिराच्या उत्खननात सापडला 2600 वर्षे जुना गूढ खजिना, लकाकतं सोनं आणि देवांच्या मूर्ती पाहून सर्वजण थक्क
दानशूर आजीबाई आणि त्यांची साधी राहणी
तर, या आजीबाईंची साधी राहणी पाहून त्या इतक्या संपत्तीच्या मालकीण असतील, असं कुणालाही चुकूनही वाटलं नव्हतं. खरं तर, कुणालाही पाहून त्याच्याबाबतचा अगदी अचूक अंदाज लावता येत नाही. एखादी व्यक्ती सर्वसाधारण दिसत असली तरी, तिची मोठ्या असामींसोबत उठबस असू शकते. एखादी व्यक्ती वरवर गरीब दिसत असली तरी ती गडगंज श्रीमंत असू शकते. आणि एखादी व्यक्ती सुटबुटात दिसत असली तरी, तिच्यावर लाखो, करोडंचं कर्ज असू शकते. अर्थात, काही व्यक्तींच्या सान्निध्यात आल्यानंतर दोन-तीन भेटींमध्येच त्यांची माहिती मिळून जाते. त्याशिवाय ती व्यक्ती कशी आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची आर्थिक स्थिती कशी आहे आणि त्याचे विचार कसे आहेत याची माहिती मिळते.
ज्या व्यक्तीकडे गडगंज संपत्ती असते, तेच लोक नेहमी त्यांचं मृत्यूपत्र तयार करत असतात. त्यांच्या मृत्यूनंतर हे मृत्यूपत्र वाचलं जातं. गरीब लोक शक्यतो असं काही करत नाहीत. कारण त्यांच्याकडे वाटण्यासारखं काही नसतं. पण एका गरीब म्हातारीने तिचं मृत्यूपत्र बनवलं. या महिलेचं घर अगदी पडकं होतं. घर आणि आजूबाजूच्या बगिच्याची साफसफाई सुद्धा झालेली नव्हती. पण तिच्या मृत्यूनंतर तिचं मृत्यूपत्र वाचल्यावर सर्वांनाच धक्का बसला. हे असं कसं झालं, याचा लोकांना विश्वासच बसेना.
काय होतं मृत्यूपत्रात?
हिल्डा लेवी असं या आजींचं नाव होतं. केंटमधील व्हिसिलटेबलमध्ये त्या राहत होत्या. 1970 मध्ये बनलेल्या एका सेमी डिटॅच्ड घरात त्या राहत होत्या. वयाच्या 98व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला होता. जेव्हा त्यांचं मृत्यूपत्र वाचलं गेलं, तेव्हा त्यात 1.4 मिलियन पाऊंड म्हणजे जवळपास 16 कोटी रुपयांचा उल्लेख होता. त्यातील साडे पाच कोटी रुपये त्यांनी फ्रेंडस् ऑफ केंट अॅण्ड कँटरबरी रुग्णालयाला दिले होते. तर तीन कोटी रुपये त्यांनी लंडनच्या Friends of Whitstable Healthcare and Moorfields Eye Hospital मधील तिच्या मित्राच्या नावे केले होते. त्यांनी धर्मादाय कारणासाठी दिलेल्या पैशाची माहिती ऐकून तर लोक अधिकच हैराण झाले. महिलेचं घर अत्यंत जीर्ण होतं. तिचं घर पाहिल्यावर ती कोट्यधीश असेल असं कुणालाही वाटलं नव्हतं.
हेही वाचा - चाक राहिलं खाली अन् यांचं विमान हवेत! लँड करताना पाकिस्तानी पायलट आणि अधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट..!
आजीबाईंकडे एवढा पैसा कुठून आला?
हिल्डा लेवी यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला? याचा शोध घेण्यात आला. तेव्हा अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. 1930मध्ये त्या जर्मनीतून इंग्लंडला निर्वासित म्हणून आल्या होत्या. नाझी छळछावणीमध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला होता. त्या अनाथ झाल्या होत्या. इंग्लंडमधील एलन जेफरी नावाच्या महिलेने त्यांना दत्तक घेतले होते. त्या डॉक्टर फ्रीडरिक आणि मिसेस इर्मा लेवी यांची मुलगी होत्या. त्यांनी इंग्लंडमध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य घालवलं. त्यांचं लग्न झालेलं नव्हतं आणि त्यांना मुलेही नव्हती. त्यांच्या काकांच्या मालमत्तेचा त्यांना हिस्सा मिळाला होता. त्यांचे काका नंतर अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यांनी त्यांची 300 कोटीहून अधिक संपत्ती बहीण-भाऊ आणि कुटुंब तसेच दूरच्या नातेवाईकांमध्ये वाटली होती. हिल्डा यांनाही तीच प्रॉपर्टी मिळाली होती.