Nobel Peace Prize 2025: व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार जिंकला. परंतु, आता त्यांनी हा पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केला आहे. मारिया मचाडोने हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या पीडित नागरिकांना आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्यांना समर्पित केला.
मारिया मचाडो म्हणाल्या, ‘मी हा पुरस्कार राष्ट्रपती ट्रम्प यांना समर्पित करते. हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या लोकांच्या संघर्षाची ओळख आहे. तसेच हा पुरस्कार आमच्या स्वातंत्र्य आणि लोकशाही साध्य करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देतो. आम्ही विजयाच्या उंबरठ्यावर आहोत आणि आज, पूर्वीपेक्षा जास्त, आम्ही आमचे मुख्य सहयोगी म्हणून राष्ट्रपती ट्रम्प, अमेरिकेतील लोक, लॅटिन अमेरिकेतील लोक आणि जगातील लोकशाही देशांवर अवलंबून आहोत.’
This recognition of the struggle of all Venezuelans is a boost to conclude our task: to conquer Freedom. We are on the threshold of victory and today, more than ever, we count on President Trump, the people of the United States, the peoples of Latin America, and the democratic… — María Corina Machado (@MariaCorinaYA) October 10, 2025
तथापि, व्हाईट हाऊसने मारियाच्या पुरस्कारावर टीका केली आहे. व्हाईट हाऊसने नोबेल समितीवर राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप केला आणि म्हटले की, ‘कधी कधी राजकारण शांततेपेक्षा वर ठेवले जाते.’ प्रवक्ते स्टीव्हन चेंग यांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले की, ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प शांतता करारांमध्ये मध्यस्थी करतात, युद्धे थांबवतात आणि जीव वाचवतात. त्यांच्याकडे मानवतावादी हृदय आहे आणि त्यांच्यासारखा कोणीही नसेल जो त्यांच्या इच्छेच्या बळावर पर्वत हलवू शकेल.’