Meta Layoffs: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने त्यांच्या सुपर इंटेलिजेंस लॅब्स एआय युनिटमधून सुमारे 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. याचा परिणाम FAIR (Facebook Artificial Intelligence Research) टीम, एआय इन्फ्रास्ट्रक्चर युनिट, उत्पादनाशी संबंधित एआय टीम आणि नव्याने स्थापन झालेल्या टीडीबी लॅबवर झाला आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये ओपनएआय, गुगल आणि इतर प्रमुख टेक कंपन्यांमधून भरती केलेल्या तज्ञांचा समावेश आहे.
जून 2025 मध्ये, मेटाने त्यांच्या एआय युनिटसाठी अब्जावधी डॉलर्स गुंतवून डेटा सेंटर आणि सुपर इंटेलिजेंस प्रोजेक्ट्स सुरू केले होते. सध्या, मेटा खर्च कमी करण्यासाठी आणि रणनीती सुधारण्यासाठी या एआय युनिटची पुनर्रचना करत आहे.
हेही वाचा - Cyber Crime : तब्बल 50 लाखांना गंडा! पुण्यातून खंडणीसाठी फोन करत ‘Digital Arrest’; 57 लाख फॉलोअर्स असलेला इन्फ्लुएन्सर कसा ठरला बळी?
सुपर इंटेलिजेंस स्ट्रॅटेजीवर परिणाम
अॅक्सिओसच्या अहवालानुसार, या कपातीचा परिणाम कंपनीच्या प्रमुख एआय मॉडेल्स आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवर झाला आहे. मेटाने अद्याप याबाबत अधिकृत विधान दिलेले नाही. अनेक संशोधक आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिल्या की त्यांना अचानक मेटातून काढून टाकण्यात आले आहे.
हेही वाचा - Viral Video: शेतकरी बापाने मुलीच्या स्कुटीसाठी जमा केली 40 हजारांची नाणी, पोतं घेऊन थेट शोरुममध्ये पोहोचला
दरम्यान, FAIR वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ युआनडोंग तियान यासह अनेक अनुभवी संशोधक या कपातीमुळे प्रभावित झाले आहेत. तथापी, संशोधक झियानजुन यांग यांनी लिहिले की, 'माझ्या कामाचे कालच एआयमधील मोठ्या नावांनी कौतुक केले आणि आज मला काढून टाकण्यात आले.' सोशल मीडियावर अनेक कर्मचाऱ्यांनी हा निर्णय धक्कादायक आणि अकाली असल्याचे म्हटले आहे.