Thursday, November 13, 2025 08:50:23 AM

Indian Crew Rescue: येमेनच्या किनाऱ्याजवळ MV फाल्कन जहाजाला आग; 23 भारतीय नागरिकांची सुटका

जहाजाच्या कॅप्टनकडून मदतीसाठी आणीबाणीची विनंती केल्यानंतर, यूएनएव्हीएफओआर अ‍ॅस्पाइड्सने ताबडतोब शोध आणि बचाव कार्य सुरू केले.

indian crew rescue येमेनच्या किनाऱ्याजवळ mv फाल्कन जहाजाला आग 23 भारतीय नागरिकांची सुटका

Indian Crew Rescue: येमेनच्या किनाऱ्याजवळ स्फोटानंतर आग लागलेल्या एमव्ही फाल्कन या जहाजावरून 23 भारतीय आणि 1 युक्रेनियन क्रू सदस्य यशस्वीरित्या वाचवण्यात आले आहेत. जहाजाच्या कॅप्टनकडून मदतीसाठी आणीबाणीची विनंती केल्यानंतर, यूएनएव्हीएफओआर अ‍ॅस्पाइड्सने ताबडतोब शोध आणि बचाव कार्य सुरू केले. कॅमेरून ध्वज असलेले हे जहाज येमेनी बंदरातून आग्नेय दिशेला जिबूतीकडे जात असताना शनिवारी अचानक स्फोट झाला आणि जहाजाला आग लागली. 

हेही वाचा - चर्चा तर होणारच! दोघांच्या वयात तब्बल 50 वर्षांचं अंतर; इथे वराला नाही तर वधुला मिळाला 1.8 कोटींचा हुंडा, का? ते वाचा

जहाजात पेट्रोलियम वायू (एलपीजी) वाहत होते. बचाव मोहिमेत सहभागी झालेल्या अ‍ॅस्पाइड्सच्या निवेदनात म्हटले आहे की, एमव्ही मेडाने एमव्ही फाल्कनमधून 24 क्रू सदस्यांना यशस्वीरित्या वाचवले, ज्यामध्ये 23 भारतीय आणि एका युक्रेनियन नागरिकाचा समावेश होता. आगीतून सुटका करण्याता आलेले क्रू सदस्य सध्या जिबूती तटरक्षक दलाच्या ताब्यात आहेत. तथापि, एकूण 26 सदस्यीय क्रूपैकी अजून 2 सदस्य बेपत्ता आहेत. जहाजाचा अंदाजे 15 टक्के भाग आगेमुळे नष्ट झाला आहे.

हेही वाचा - ASEAN Summit 2025: मलेशियात मोदी-ट्रम्प भेटणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सुरुवातीच्या अहवालांमध्ये आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. युरोपियन युनियन नौदल दलने बेपत्ता क्रू सदस्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर बचाव मोहिमेचा वेग वाढवण्यात आला आहे.
 


सम्बन्धित सामग्री