डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं! भारतीय वंशाच्या नवी पिल्ले यांना मिळाला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार

भारतीय वंशाच्या प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकन कायदेतज्ज्ञ नवनेथम 'नवी' पिल्ले यांना या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीचे प्रमुख जोर्गेन वॅटने फ्रिडनेस यांनी ओस्लो येथे या पुरस्काराची घोषणा केली.
डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं! भारतीय वंशाच्या नवी पिल्ले यांना मिळाला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार
Navi Pillay Nobel Peace Prize

आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत आदराने पाहिल्या जाणाऱ्या 2026 च्या नोबेल शांतता पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भारतीय वंशाच्या प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकन कायदेतज्ज्ञ नवनेथम ‘नवी’ पिल्ले यांना या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीचे प्रमुख जोर्गेन वॅटने फ्रिडनेस यांनी ओस्लो येथे या पुरस्काराची घोषणा केली. नोबेल समितीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) माहिती देताना स्पष्ट केले की, शांतता, मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला चालना देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात येत आहे. नवी पिल्ले यांनी 2008 ते 2014 या कालावधीत संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त (UN High Commissioner for Human Rights) म्हणून महत्त्वाची धुरा सांभाळली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न पुन्हा भंगले

दुसरीकडे, नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिले आहे. ट्रम्प यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि युद्धे थांबवल्याचा दावा करत या पुरस्कारावर आपला दावा ठोकला होता. मात्र, नोबेल समितीने ट्रम्प यांच्या दाव्यांची दखल न घेता जागतिक मानवाधिकार चळवळीला मोठे योगदान देणाऱ्या नवी पिल्ले यांच्या नावाची निवड केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात ट्रम्प यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच आली आहे.

पुरस्कारासाठी ट्रम्प यांचे मोठे दावे आणि युक्तिवाद

गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प नोबेल पुरस्काराबाबत अत्यंत आक्रमक भाष्य करत होते. ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी दावा केला होता की, त्यांनी इस्रायल-हमास युद्धासह जगभरातील तब्बल 8 युद्धे संपवली आहेत आणि जगाला महाविनाशापासून वाचवले आहे. तसेच इराणला अणुशस्त्रे विकसित करण्यापासून रोखल्याचा आणि युक्रेन-रशिया युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी केल्याचा उल्लेखही त्यांनी केला होता. नोबेल पुरस्काराच्या इतिहासात आपल्यापेक्षा अधिक पात्र व्यक्ती कोणीही नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.

हेही वाचा – साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा; ‘या’ कवयित्रीला मिळाला यंदाचा सन्मान

‘मला पुरस्कार न देणे ही नोबेल समितीची नामुष्की’

पुरस्काराची घोषणा होण्यापूर्वी 7 ऑक्टोबर रोजी ओव्हल ऑफिसमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले होते की, “माझ्यासारख्या काम करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार न देण्याची नोबेल समितीची ख्याती आहे. मला पुरस्कार मिळो अथवा न मिळो, मी खूप काही साध्य केले आहे. मला हा सन्मान न देणे ही उलट नोबेल समितीसाठीच मोठी नामुष्की ठरेल.” मात्र, नोबेल समितीने आपल्या पारंपरिक तत्त्वांना धरून मानवाधिकार आणि शांततेसाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या नवी पिल्ले यांच्या नावावर मोहर उमटवली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version