Israeli Prime Minister Benjamin Netanyahu With PM Modi
Edited Image
Israel Attack On Iran: इराण आणि इस्रायलमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला केला आणि सरकारी तळ आणि लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य केले. इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 78 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 20 हून अधिक इराणी कमांडर आहेत. दरम्यान आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला. त्यांनी पंतप्रधान मोदींना सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली.
दरम्यान, इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने याबाबत एक्स वर एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, 'इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जर्मन चान्सलर, भारतीय पंतप्रधान आणि फ्रेंच राष्ट्राध्यक्षांसह जागतिक नेत्यांशी चर्चा केली आहे. ते अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि ब्रिटिश पंतप्रधानांशीही चर्चा करतील.'
हेही वाचा - अमेरिकेचा चीनसोबत मोठा करार! खनिजांच्या बदल्यात मिळणार अमेरिकन कॉलेजमध्ये प्रवेश
तथापी, पंतप्रधान मोदींनी एका पोस्टमध्ये नेतन्याहू यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मला फोन केला. त्यांनी मला सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. मी भारताच्या चिंता व्यक्त केल्या आणि या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित करण्याची गरज यावर भर दिला.'
हेही वाचा - ट्रम्प-मस्क यांच्यातील वाद संपला! एलोन मस्कने गेल्या आठवड्यात एक्सवर लिहिलेल्या पोस्टवर व्यक्त केला खेद
इस्रायली पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी रात्रीपासून जर्मन चान्सलर, भारतीय पंतप्रधान आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसह जागतिक नेत्यांशी चर्चा केली आहे. ते अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि ब्रिटिश पंतप्रधानांशीही चर्चा करतील.