UNSC Open Debate: पाकिस्तानला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमानाचा सामना करावा लागला आहे. भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानला थेट प्रत्युत्तर देत त्याच्या दाव्यांवर आघात केला. भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पार्वतानेनी यांनी पाकिस्तानच्या विधाने आणि आरोपांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. भारतीय प्रतिनिधी हरीश यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले की, 'दुर्दैवाने, आम्हाला दरवर्षी आपल्या देशाविरुद्ध, विशेषतः भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरबद्दल, दिशाभूल करणारी भाषणे ऐकावी लागतात.'
हेही वाचा - China J-20A Fighter Jet: चीनने उडवली डोनाल्ड ट्रम्पची झोप! F-35 ला टक्कर देण्यासाठी विकसित केलं J-20A 'माईटी ड्रॅगन' लढाऊ विमान
पाकिस्तानच्या आरोपांचे खंडन -
हरीश यांनी पाकिस्तानच्या इतिहासाचा संदर्भ देत म्हटले की, 'स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट घडवून आणणारा आणि पद्धतशीर नरसंहार करणारा देश आता जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी खोटी विधाने करतो. पाकिस्तानने 1971 मध्ये ऑपरेशन सर्चलाइट सुरू केले. यादरम्यान, सैन्याने 4 लाख महिलांवर लैंगिक अत्याचार केले.'
हेही वाचा - India foreign policy: चीनच्या आर्थिक डावपेचामुळे वाढली अमेरिकेची डोकेदुखी; दोघांच्या वादात भारताला फटका
दहशतवादाच्या मुद्द्यावरही भारताचा आघात
दरम्यान, भारताने दहशतवादाविरोधी मुद्द्यांवरही पाकिस्तानला कोंडीत पकडले. पाकिस्तानचा प्रयत्न होता की, तो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताविरुद्ध विधाने मांडून दिशाभूल करेल, पण भारताने या आरोपांना स्पष्टपणे फेटाळले. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला अपमानित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पूर्वीही भारताने दहशतवाद, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन यावर पाकिस्तानचे काळे सत्य जगासमोर आणले आहे.