California Shooting Incident: अमेरिकेत वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार; 14 जखमी, हल्लेखोर फरार

कॅलिफोर्नियातील स्टॉक्टनमध्ये मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात झालेल्या गोळीबारात 14 जण जखमी झाले. आरोपी अद्याप फरार असून पोलिसांनी प्राथमिक तपासात हा लक्ष्य करून केलेला हल्ला असू शकतो असे नमूद केले.

California Shooting Incident: अमेरिकेत वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार; 14 जखमी, हल्लेखोर फरार

अमेरिका: कॅलिफोर्नियातील स्टॉक्टन (Stockton) शहरात झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात झालेल्या या हल्ल्यात किमान 14 जणांना गोळ्या लागल्या असून आरोपी अजूनही फरार आहे. पोलिसांनी सांगितले की प्राथमिक तपासातून हा लक्ष्य करून केलेला हल्ला असू शकतो.

स्टॉक्टनचे उपमहापौर जेसन ली (Jason Lee) यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, “माझ्या शहरात अशा प्रकारची हिंसा पाहून मन हेलावून गेले आहे. एका वाढदिवसाच्या पार्टीत असा हल्ला होणे अकल्पित आहे. आईसक्रीम शॉप कधीच भीतीचे ठिकाण नसावे.” गोळीबाराची घटना लुसाइल अव्हेन्यू (Lucile Avenue) परिसरात घडली. San Joaquin County Sheriff’s Office ने एक्स (X) वर दिलेल्या माहितीनुसार, अनेक जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. “घटनास्थळ अद्याप पूर्णपणे बंद असून तपास सुरू आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: Nashik News: व्हॉट्सॲपवर ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ स्टेटस; दीड वर्षांच्या चिमुकल्यासह कुटुंबातील चार जणांनी संपवलं आयुष्य

उपमहापौर जेसन ली यांनी पुढे लिहिले की, “माझ्या बालपणातही हिंसाचाराचा अनुभव आला होता आणि आज पुन्हा आपल्या मुलांवर, कुटुंबांवर अशीच वेळ येताना पाहून मन दु:खी झाले आहे. मी प्रशासनाशी संपर्कात असून तपशील जाणून घेत आहे. आपल्या समुदायाला सत्य जाणण्याचा आणि न्याय मिळण्याचा हक्क आहे.”

घटनास्थळी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हल्ला Dairy Queen रेस्टॉरंटच्या जवळ किंवा आत झाला असण्याची शक्यता आहे. वाढदिवसासाठी जमलेले कुटुंबे अचानक झालेल्या गोळीबाराने घाबरून पळू लागली. शेवटी, उपमहापौरांनी शहरातील नागरिकांना धीर देत म्हटले, “या घटनेत जखमी झालेल्या मुलांना, त्यांच्या कुटुंबांना आणि संपूर्ण स्टॉक्टन समुदायाला माझ्या प्रार्थना आणि संवेदना. देव आपल्याला बळ देओ. आपण हिंसेला कधीच सामान्य होऊ देणार नाही.”

हेही वाचा: Australian PM Wedding : 62 वर्षीय ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांचा अजब रेकॉर्ड, कारण ऐकून तुम्ही व्हाल थक्क

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number