Thursday, July 17, 2025 02:50:47 AM

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामध्ये आत्मघातकी हल्ला, 13 सैनिक ठार; 'या' संघटनेने घेतली जबाबदारी

या आत्मघातकी हल्ल्यात 13 सैनिक ठार झाले, तर दोन डझनहून अधिक लोक जखमी झाले. मीर अलीच्या खादी मार्केटमध्ये हा हल्ला झाला. जखमींमध्ये 12 हून अधिक महिला आणि मुलांचा समावेश आहे.

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामध्ये आत्मघातकी हल्ला 13 सैनिक ठार या संघटनेने घेतली जबाबदारी
प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

इस्लामाबाद: पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथील उत्तर वझिरीस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 13 सैनिक ठार झाले, तर दोन डझनहून अधिक लोक जखमी झाले. मीर अलीच्या खादी मार्केटमध्ये हा हल्ला झाला. जखमींमध्ये 12 हून अधिक महिला आणि मुलांचा समावेश आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा हल्ला सकाळी 7:40 वाजता घडला. एका कारने पाकिस्तानी सैन्याच्या बॉम्ब निकामी करणाऱ्या वाहनाला धडक दिली. हल्ल्याच्या वेळी हे वाहन बॉम्ब निकामी करण्याच्या कर्तव्यावर होते. 

हेही वाचा - 'आत्मसमर्पण' हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही.. इराणच्या अली खामेनींचे ट्रम्प यांना प्रत्युत्तर

'या' गटाने स्विकारली हल्ल्याची जबाबदारी - 

दरम्यान, टीटीपीच्या उसुद-उल-हर्ब गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, एका हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन ताफ्यावर आदळवले. या आत्मघातकी हल्ल्यात 10 लष्करी कर्मचारी, 13 सैनिक आणि 19 नागरिक जखमी झाले आहेत. हल्ल्यात जवळपासच्या घरांचेही नुकसान झाले आहे.

हेही वाचा - विंग कमांडर अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी अधिकारी तालिबानच्या चकमकीत ठार

पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ - 

प्राप्त माहितीनुसार, या हल्ल्यामुळे दोन घरांचे छत कोसळले, ज्यामध्ये 6 मुले जखमी झाली. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या वर्षी पाकिस्तानी सैन्याने टीटीपीशी संबंधित 10 संशयित दहशतवाद्यांना ठार मारले आहे.
 


सम्बन्धित सामग्री