Ukraine War: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातील संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पुतीन यांच्यासोबत गुप्त पातळीवर काही महत्त्वाच्या वाटाघाटी केल्या होत्या, असा दावा अनेक राजकीय निरीक्षक करत आहेत. परंतु या भेटीचा शेवट ट्रम्प यांच्या अपेक्षेप्रमाणे झाला नाही, उलट त्यांचा "नोबेल स्वप्नाचा बुडवाज" झाल्याचे चित्र समोर येत आहे.
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी युक्रेन युद्धाबाबत दिलेली आश्वासने लक्षवेधी ठरली होती. "आठवडाभरात युद्ध थांबवतो,'' असे ते ठामपणे म्हणाले होते. पण यामागे एक सुप्त योजना होती; युक्रेनमधील काही भाग रशियाला सोपवणे आणि त्या बदल्यात दुर्मीळ खनिजांच्या उत्खननासाठी अमेरिकेला मोकळीक मिळवणे. ट्रम्प यांच्या या कल्पनेमुळे अमेरिकेचा फायदा आणि त्यांचा स्वतःचा राजकीय फायदा दोन्ही साध्य होईल, असे त्यांना वाटत होते.
परंतु या सर्व योजनांमध्ये त्यांनी पुतीन यांच्यावर खूप विश्वास ठेवला; जो शेवटी त्यांच्या अंगलट आला. अलास्कामध्ये दोघांची एक महत्त्वाची भेट झाली होती, जी सुरुवातीला उत्साही वाटली, पण शेवटी ती थंड आणि औपचारिक झाली. कोणतीही ठोस सहमती न देता पुतीन निघून गेले. ट्रम्प यांनी आणलेला कराराचा मसुदा पुतीन यांनी अंगभर झटकला आणि त्यांचे नोबेल पुरस्काराचे स्वप्न उध्वस्त झाले.
हेही वाचा: Oil Production: रशियासह 22 देशांचा मोठा निर्णय! भारतावर होणार थेट परिणाम
या भेटीदरम्यान पुतीन यांनी आपल्या धोरणाचा स्पष्ट संदेश दिला. त्यांचे परराष्ट्रमंत्री लावरोव यांनी ‘सीसीसीपी’ लिहिलेला टी-शर्ट घालून सोव्हिएत संघाच्या पूर्वीच्या प्रदेशांवर दावा सांगितला होता. यामुळे पुतीन यांचा उद्देश फक्त युक्रेनवर ताबा मिळवण्यापुरता मर्यादित नाही, हे स्पष्ट होते. ट्रम्प यांना वाटले होते की पुतीन त्यांचे मित्र आहेत, पण त्यांनी हे विसरले की आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणताही 'मित्र' नसतो.
युक्रेनला दिलेल्या अमेरिकन मदतीवर ट्रम्प यांनी जाहीरपणे शंका उपस्थित केली होती. त्यांनी झेलेन्स्की यांच्याशी अवमानकारक वर्तन केले, आणि युक्रेनला 'तासाभरात रशियासमोर हरतील' अशी वक्तव्य केली. मात्र प्रत्यक्षात युक्रेनने जिद्दीने प्रतिकार केला आणि युद्ध दीर्घकाळ चालले.
रशियाने युक्रेनच्या जवळपास 25 टक्के प्रदेशावर ताबा मिळवला असून, ट्रम्प यांनी केलेल्या ‘रशिया हा कागदी वाघ आहे’ या विधानालाही पुतीन यांनी अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिले. युरेनियमसारख्या संसाधनांसाठी अमेरिका अजूनही रशियावर अवलंबून आहे, हे त्यांनी जाहीरपणे सांगितले.
ट्रम्प यांचा पुतीनवरील विश्वास, युक्रेनप्रश्नी त्यांच्या कल्पना आणि नोबेल पुरस्काराचे स्वप्न हे सर्व आता फसलेले दिसत आहे. आणि त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते; राजकारणात भावनांपेक्षा वास्तव जड असते.