Tuesday, November 18, 2025 10:13:17 PM

H-1B Visa : कर्मचाऱ्यांना मोठा इशारा, इमिग्रेशन नियमांमध्ये मोठा बदल

H-1B व्हिसावर असलेल्या सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना पुढील मार्गदर्शन मिळेपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवास शक्यतो पुढे ढकलावा

h-1b visa   कर्मचाऱ्यांना मोठा इशारा इमिग्रेशन नियमांमध्ये मोठा बदल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या खूप चर्चेत आहेत. सध्या ते H-1B व्हिसाबद्दल धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत. H-1B व्हिसाच्या शुल्कात त्यांनी मोठी वाढ केली असून तब्बल 88 लाख रूपये H-1B साठी भरावी लागणार आहेत.  तर यासोबतच काही नियम आणि अटी बदलण्यात आल्या. 

याबद्दल सदर्न कॅलिफोर्निया यांनी स्पष्टपणे इशारा देत म्हटले की, "H-1B व्हिसा धारक, कर्मचारी, प्राध्यापक यांनी सध्याच्या पार्श्वभूमीवर आपला आंतरराष्ट्रीय प्रवास पुढे ढकलावा आणि अमेरिकेच्या बाहेर जाणे टाळा".

हेही वाचा - Nobel Prize 2025: भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर! जॉन क्लार्क, मिशेल एच. डेव्होरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना मिळाला जागतिक सन्मान 

 सावधगिरी म्हणून सध्या अमेरिकेत H-1B व्हिसावर असलेल्या सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना पुढील मार्गदर्शन मिळेपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवास शक्यतो पुढे ढकलावा असेदेखील सांगण्यात आले आहे. या नवीन घोषणेची अंमलबजावणी होण्यापूर्वी परदेशात राहणाऱ्या H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत परतण्याचे आवाहनही यादरम्यान करण्यात आले. 

हेही वाचा - India foreign policy: चीनच्या आर्थिक डावपेचामुळे वाढली अमेरिकेची डोकेदुखी; दोघांच्या वादात भारताला फटका

मात्र अजूनही काही गोष्टी  स्पष्ट होत नसल्याने एकच गोंधळ उडाल्याचे यावरून बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना मोठा इशारा युनिव्हर्सिटींनी दिला आहे.


सम्बन्धित सामग्री