Vietnam Indian Tourist Boat Accident : मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; 15 पर्यटकांचा मृत्यू, तर 32 हून अधिक जणांचा जीव धोक्यात

व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'फू क्वोक आयलंड' येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. परदेशात फिरायला गेलेल्या भारतीय पर्यटकांची बोट उलटली आहे.

Vietnam Indian Tourist Boat Accident : मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली;  15 पर्यटकांचा मृत्यू, तर 32 हून अधिक जणांचा जीव धोक्यात

व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ‘फू क्वोक आयलंड’ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. परदेशात फिरायला गेलेल्या भारतीय पर्यटकांची बोट उलटली असून, तब्बल 33 हून अधिक भारतीय प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याची एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ‘फू क्वोक आयलंड’ जवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक टूरिस्ट बोट खराब वातावरण आणि समुद्रातील खवळलेल्या लाटांमुळे समुद्रात उलटली आहे. दरम्यान या भीषण अपघातात 32 पैकी काही पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान दुर्घटनेत आतापर्यंत 15 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली आहे.

हेही वाचा- Medicine Price Update: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबाची 39 औषधे होणार स्वस्त
दरम्यान घटनेची माहिती मिळताच व्हिएतनामच्या स्थानिक प्रशासनाने आणि रेस्क्यू टीमने  तातडीने बचाव कार्यास शर्थीचे प्रयत्न दर्शवले आहे. पाण्यात बुडणाऱ्या अनेक प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अजूनही काही प्रवासी बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या भीषण अपघातानंतर व्हिएतनाममधील भारतीय दूतावास पूर्णपणे अलर्ट मोडवर आला असून भारतीय दूतावासाने मदतीसाठी अधिकृत हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केले आहेत. या अपघातातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत व माहिती देण्यासाठी व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी आणि हनोई येथे भारताच्या दूतावासाकडून विशेष कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहेत.  

मदतीसाठी हेल्पलाईन आणि कंट्रोल रूम सुरू
यावेळी भारतीय दूतावासाने स्पष्ट केलं आहे की, एका दुःखद घटनेत, काही तासांपूर्वी व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ अनेक भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट उलटली आहे. स्थानिक प्रशासनाकडून शोध आणि बचाव कार्य सुरू असून, घटनेचा नेमका तपशील मिळवला जात आहे. पीडित कुटुंबांना माहिती आणि मदत देण्यासाठी, हो चि मिन्ह शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, ज्यावर +84 36 281 7930, +84 91 552 37 14 आणि +84 33 452 0414 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. हनोईमध्येही एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्यावर +84 91 308 9165 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. आम्ही कोणत्याही मदतीसाठी आणि प्रश्नांसाठी उपलब्ध आहोत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number