‘आम्ही मध्यस्थी स्वीकारणारी नाही आणि स्वीकारणारही नाहीत…’, पंतप्रधान मोदींचे ट्रम्प यांना सडेतोड उत्तर

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी मोदी आणि ट्रम्प यांच्यातील फोनवरून झालेल्या संभाषणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की ट्रम्प यांनी फोन करण्याची विनंती केली होती.

‘आम्ही मध्यस्थी स्वीकारणारी नाही आणि स्वीकारणारही नाहीत…’, पंतप्रधान मोदींचे ट्रम्प यांना सडेतोड उत्तर
Edited Image

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूर संदर्भात पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 35 मिनिटे फोनवरून चर्चा झाली. यादरम्यान पंतप्रधानांनी दहशतवादावर आपले विचार मांडले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की, भारताने ऑपरेशन सिंदूरवर आपले विचार ठामपणे मांडले आहेत. आज ट्रम्प आणि पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यात बैठक होणार आहे. कॅनडामध्ये झालेल्या जी7 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी क्रोएशियाला रवाना झाले आहेत. 

दरम्यान, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी मोदी आणि ट्रम्प यांच्यातील फोनवरून झालेल्या संभाषणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की ट्रम्प यांनी फोन करण्याची विनंती केली होती. यानंतर, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याशी 35 मिनिटे फोनवर चर्चा केली. ट्रम्प यांनी मोदींना विनंती केली आहे की जर ते कॅनडाहून परतताना अमेरिकेतून गेले तर ते भेटू शकतात. तथापि, पंतप्रधानांनी ट्रम्पचा प्रस्ताव फेटाळून लावत म्हटले आहे की, त्यांचे क्रोएशियामध्ये आधीच अनेक कार्यक्रम नियोजित आहेत, त्यामुळे ते वॉशिंग्टनला येऊ शकत नाहीत.

हेही वाचा – ‘आम्ही 1971 चा बदला घेऊ…’; असीम मुनीरची भारताला पुन्हा धमकी

तथापी, ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ते अजूनही सुरू आहे. पंतप्रधानांनी ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात सांगितले की ते या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाहीत. दोन्ही नेत्यांनी इराण आणि इस्रायलमधील संघर्षावरही चर्चा केली. तसेच मिस्त्री यांनी दोन्ही देशांमध्ये कोणताही व्यापार करार झाला नसल्याचं स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा – लाईव्ह टेलीकास्ट सुरू असताना इस्रायलचा इराणी ब्रॉडकास्ट इमारतीवर हल्ला; टीव्ही अँकरने काढला स्टुडिओमधून पळ

याशिवाय, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना सांगितले की, भारत आता दहशतवादाला युद्ध म्हणून पाहतो. भारताचे ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. तथापी, यावेळी मोदी आणि ट्रम्प यांच्यात रशिया-युक्रेन वाद आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशावर चर्चा झाली. तसेच पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना क्वाडच्या पुढील बैठकीसाठी भारतात येण्याचे आमंत्रण दिले. यावर ट्रम्प यांनी भारत भेटीस उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number