Pakistan Army Chief General Asim Munir
Edited Image
वॉशिंग्टन: गेल्या महिन्यात भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला होता. परंतु, दोन्ही देशामध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता सध्या अमेरिकेत असेलेले पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी भारताना पुन्हा धमकी दिली आहे. मुनीर यांनी अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायालाही संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, पाकिस्तानने अलिकडेच 4 दिवस चाललेल्या लष्करी संघर्षात विजय मिळवला आहे. मुनीर यांनी भारताला आव्हान देत 1971 च्या युद्धाचा बदला घेतला जाईल, असा इशारा दिला. यादरम्यान मुनीर यांनी काश्मीरबद्दलही विधान केले. आज असीम मुनीर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.
मुनीर यांनी म्हटलं की, पाकिस्तानने भारताविरुद्ध पाच आघाड्यांवर युद्ध लढले, ज्यामध्ये सायबर हल्ला देखील समाविष्ट होता. मुनीर यांनी दावा केला की, हल्लेखोरांनी 70 टक्के ग्रिड स्टेशन हॅक करून ते बंद केले होते. पाकिस्तानी ड्रोन दिल्ली आणि गुजरातपर्यंत गेले होते. तथापी, मुनीर यांनी कबूल केले की त्यांना भारताविरुद्ध युद्ध लढण्यासाठी चीनकडून मदत मिळाली होती.
हेही वाचा - लाईव्ह टेलीकास्ट सुरू असताना इस्रायलचा इराणी ब्रॉडकास्ट इमारतीवर हल्ला; टीव्ही अँकरने काढला स्टुडिओमधून पळ
G-7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित केला दहशतवादाचा मुद्दा -
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G-7 शिखर परिषदेत आउटरीच सत्राला संबोधित केले. सुरक्षा आव्हानांवर भर देत, पंतप्रधान मोदींनी देशांना दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईला बळकटी देण्याचे आवाहन केले. यासोबतच, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी जागतिक समुदायाचे आभार मानले. पहलगाम दहशतवादी हल्ला हा केवळ भारतावरच नाही तर संपूर्ण मानवतेवर हल्ला होता, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. तथापी, त्यांनी जगातील मोठ्या देशांनी पाकिस्तानला दिलेल्या सवलतींचा मुद्दा उपस्थित केला.
हेही वाचा - Israel Attack On Iran: इराणवरील हल्ल्यानंतर नेतन्याहू यांचा पंतप्रधान मोदींना फोन
जी-7 बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या शेजारी दहशतवादाचे पालनपोषण आहे. जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी, आपले विचार आणि धोरण स्पष्ट असले पाहिजे. जर कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असं आवाहनही यावेळी मोदींनी केलं.