आकाशात कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं? फ्लाय दुबईच्या विमानामधील प्लंबरने सांगितला थरार

विमानाने उड्डाण घेतलेले असताना कॉकपिटमध्येच ओमाणी सह-वैमानिकाने (Co-Pilot) मुंबईचे रहिवासी असलेले मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर अचानक चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात कॅप्टन स्मित गंभीर जखमी होऊन कॉकपिटच्या जमिनीवर कोसळले.
Yaniv Hayoun Israeli passenger
हवेतच कॉकपिटमध्ये थरार, 'या' व्यक्तीने वाचवला 180 प्रवाशांचा जीव

Flydubai pilot attack incident: फ्लाय दुबईच्या विमानात हवेतच एक अत्यंत थरारक आणि रोंगटे उभे करणारी घटना घडली आहे. विमानाने उड्डाण घेतलेले असताना कॉकपिटमध्येच ओमाणी सह-वैमानिकाने (Co-Pilot) मुंबईचे रहिवासी असलेले मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर अचानक चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात कॅप्टन स्मित गंभीर जखमी होऊन कॉकपिटच्या जमिनीवर कोसळले.

सह-वैमानिक विमान पाडण्याच्या किंवा अपघातात घालण्याच्या विचारात होता. मात्र, प्रचंड रक्तस्त्राव होत असतानाही कॅप्टन स्मित यांनी अत्यंत धीरोदात्तपणे कॉकपिटचा दरवाजा उघडला, जेणेकरून बाहेरून मदत मिळू शकेल. त्यांनी दाखवलेल्या या अद्भूत प्रसंगावधानामुळे विमानातील सर्व 174 प्रवासी आणि क्रू मेंबर अशा एकूण 180 जणांचे प्राण वाचले आहेत.

इस्रायली प्रवाशाचे धाडस आणि २ ऑफ-ड्यूटी वैमानिकांनी सांभाळले विमानाचे नियंत्रण

दरम्यान, कॉकपिटचा दरवाजा उघडताच इस्रायली नागरिक यानिव हयून यांनी केबिन क्रूच्या मदतीने कॉकपिटमध्ये धाव घेतली. त्यांनी मागील बाजूने पकडून हल्लेखोर सह-वैमानिकाला कॉकपिटच्या बाहेर खेचले आणि इतर प्रवाशांच्या मदतीने त्याला बांधून ठेवले. त्याच वेळी विमानात प्रवासी म्हणून प्रवास करत असलेल्या 2 ऑफ-ड्यूटी वैमानिकांनी (Off-Duty Pilots) तातडीने कॉकपिटचा ताबा घेतला आणि विमानाचे सुरक्षित लँडिंग घडवून आणले. यानिव हयून यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, जखमी कॅप्टन स्मित यांनी दरवाजा उघडला नसता तर मोठा अपघात होऊन सर्वांचा मृत्यू झाला असता; स्मित हेच या घटनेतील खरे हिरो आहेत.

हेही वाचा – इस्रायलला जाणाऱ्या विमानात थरार! कॉकपिटमध्ये भारतीय पायलटवर चाकूहल्ला; 174 प्रवाशांचे प्राण कसे वाचले?

मुंबईकर कॅप्टनचे कौतुक

कॅप्टन स्मित मच्छार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दाखवलेल्या या अद्भूत धैर्याचे जगभरातून कौतुक होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन स्मित यांच्या तत्परतेची प्रशंसा करत त्यांच्यामुळेच मोठा अपघात टळल्याचे म्हटले. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईच्या या सुपुत्राचा ‘खरा हिरो’ असा गौरव केला. स्वतःवर गंभीर हल्ला झालेला असतानाही 180 प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांचा संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान असल्याचे सांगत फडणवीस यांनी ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, अशा शुभेच्छा दिल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version