Persian Gulf: ना पूर्वेला, ना मध्य भागी! मग पश्चिम आशियाला ‘मिडल ईस्ट’ का म्हणतात? युरोप केंद्रित मानसिकतेतून जन्माला आलेली एक अजब संज्ञा

भारतात मात्र या भागाला अधिक योग्यरित्या “पश्चिम आशिया” असे संबोधले जाते.

Persian Gulf: ना पूर्वेला, ना मध्य भागी! मग पश्चिम आशियाला ‘मिडल ईस्ट’ का म्हणतात? युरोप केंद्रित मानसिकतेतून जन्माला आलेली एक अजब संज्ञा

पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण जगाचे लक्ष पुन्हा एकदा त्या भागाकडे वळले आहे. इस्रायल, अमेरिका आणि ईरान यांच्यातील वाढत्या तणावातून सुरू झालेल्या या संघर्षाचे परिणाम अनेक देशांवर दिसू लागले आहेत. सततच्या हल्ल्यांमुळे मिडिल ईस्टमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेला स्ट्रेट ऑफ होर्मुझ चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या मार्गाने जाणाऱ्या जहाजांच्या सुरक्षिततेबाबत अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, “मिडिल ईस्ट” हा भाग नेमका कुठे आहे? प्रत्यक्षात पर्शियन आखाताच्या परिसरातील प्रदेशाला सामान्यतः मिडिल ईस्ट असे म्हटले जाते. मात्र भौगोलिकदृष्ट्या पाहता हा प्रदेश ना जगाच्या मध्यभागी आहे, ना पूर्वेकडे. तरीही हा शब्द प्रचलित कसा झाला, यामागे इतिहासातील एक वेगळा संदर्भ आहे.

“मिडिल ईस्ट” ही संज्ञा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वापरात आली. अमेरिकन नौदल रणनीतिकार अल्फ्रेड थायर महान यांनी 1902 मध्ये प्रथम हा शब्द वापरल्याचे मानले जाते. त्या काळात युरोपला जगाचे केंद्र मानले जात होते. युरोपच्या जवळ असलेल्या प्रदेशांना “नियर ईस्ट” असे म्हटले गेले, तर चीन आणि जपानसारख्या दूरच्या देशांना “फार ईस्ट” असे संबोधले गेले. या दोन्हींच्या मधोमध असलेल्या प्रदेशाला म्हणजे ईरान, इराक, सौदी अरेबिया आणि इस्रायलसारख्या देशांना “मिडिल ईस्ट” असे नाव देण्यात आले. त्यामुळे ही संज्ञा पूर्णपणे युरोपकेंद्रित दृष्टीकोनातून उदयास आल्याचे मानले जाते.

हेही वाचा: What is Zero FIR : निर्भया प्रकरणानंतर 'हा' कायदा आला अस्तित्वात, अजित पवार अपघात प्रकरणाने पुन्हा आला प्रकाशझोतात; काय आहे 'झिरो FIR'? जाणून घ्या सविस्तार

पर्शियन आखाताशी या संज्ञेचा संबंध असला तरी दोन्ही एकसारखे नाहीत. पर्शियन आखाताभोवती वसलेल्या देशांना सामान्यतः “गल्फ देश” म्हटले जाते. यात संयुक्त अरब अमिरात, कतार, कुवैत, बहरीन, ओमान आणि सौदी अरेबिया यांचा समावेश होतो. हे देश मिडिल ईस्टचा भाग असले तरी पर्शियन आखात स्वतः मिडिल ईस्ट नसून त्या प्रदेशाचा एक महत्त्वाचा भौगोलिक भाग आहे.

मिडिल ईस्ट या व्यापक प्रदेशात ईरान, इराक, सौदी अरेबिया, इस्रायल यांच्यासह सीरिया, लेबनॉन, जॉर्डन, तुर्की, कुवैत, बहरीन, कतार, ओमान, येमेन, लिबिया, सायप्रस, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिरात यांसारख्या अनेक देशांचा समावेश होतो. मात्र या प्रदेशाची अचूक भौगोलिक सीमा निश्चित नसल्यामुळे वेगवेगळ्या संदर्भांत त्याची व्याख्या थोडी बदलू शकते.

भारताच्या दृष्टीने पाहिले तर हा प्रदेश पूर्वेकडे नसून पश्चिमेकडे येतो. त्यामुळे भारतात या भागाला “पश्चिम आशिया” असे संबोधणे अधिक योग्य मानले जाते. सरकारी कागदपत्रे आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्येही “वेस्ट एशिया” ही संज्ञा वापरली जाते.

अनेकदा लोक मिडिल ईस्ट आणि गल्फ देश यांना एकच समजतात, पण प्रत्यक्षात गल्फ देश म्हणजे पर्शियन आखाताभोवती असलेले देश, तर “अरब देश” ही संज्ञा भाषा आणि संस्कृतीच्या आधारावर दिली जाते. अरबी भाषा आणि अरब संस्कृतीशी संबंधित देश मिडिल ईस्ट तसेच उत्तर आफ्रिकेतही पसरलेले आहेत.

हेही वाचा: Chardham Yatra 2026 Registration: चार धाम यात्रेसाठी 10 लाख भाविकांची नोंदणी; 'या' तारखेपर्यंत करता येईल रजिस्ट्रेशन

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number