Thursday, May 16, 2024 01:21:40 PM

'मी आणि रोहिणी लोकसभा लढवणार नाही'

मुंबई, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : मी आणि रोहिणी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असे राशपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले. राशपचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर खडसे यांनी ही घोषणा केली.

याआधी भाजपाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी रावेर मतदारसंघातून एकनाथ खडसेंची सून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच एकनाथ खडसे यांनी पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला. एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.

खडसेंनी तब्येतीचे कारण पुढे करून निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. रोहिणी खडसे या विधानसभेची निवडणूक लढवण्यास जास्त उत्सुक असल्याचे ते म्हणाले. रावेरमधील मविआचा उमेदवार लवकरच जाहीर होईल आणि लढत चुरशीची होईल, असे संकेत त्यांनी दिले.


सम्बन्धित सामग्री






Live TV