पुणे, १६ मे २०२४, प्रतिनिधी : खडकवासला प्रकल्पातील चार धरणात मिळून केवळ २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चार धरणांमध्ये एकूण ६. ७० टीएमसी म्हणजे २३ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराला दोन महिने पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे, पुणेकरांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
कुठे किती पाणीसाठा शिल्लक ?
खडकवासला - १. २१ टीएमसी.
पानशेत - २. ०२ टीएमसी.
वरसगाव - ३. २८ टीएमसी
टेमघर - ०. १९ टीएमसी.