Sunday, May 19, 2024 02:45:40 AM

साताऱ्यात मतदान वाढीसाठी जनजागृतीदोन हजार कर्मचाऱ्यांनी केल्या गृहभेटी

साताऱ्यात मतदान वाढीसाठी जनजागृतीदोन हजार कर्मचाऱ्यांनी केल्या गृहभेटी

सातारा, ५ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून शनिवारी मतदार गृहभेट कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या दोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एक लाख कुटुबांना भेट दिली. यामाध्यमातून निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी जनजागृती करण्यात आली.सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या जिल्हा नोडल अधिकारी याशनी नागराजन यांनी ४ मे रोजी मतदार गृहभेट दिवस राबविला. यासाठी जिल्हा परिषदेकडील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये दोन हजार अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. या सर्वांनी मतदान जनजागृतीसाठी एक लाख कुटुंबाला भेट दिली. या भेटीत संबंधितांना मतदानाचे महत्व सांगण्यात आले. तसेच मतदारांना मतदानादिवशी काही अडचणी येऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना सूचनाही केली


सम्बन्धित सामग्री