Friday, May 24, 2024 10:40:01 AM

fourth phase voting percentage decrease
चौथ्या टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला

लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी, १३ मे, २०२४ रोजी पार पडले. महाराष्ट्रात सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले आहे, तर देशात ६७.७१ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला

मुंबई, १४ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी, १३ मे, २०२४ रोजी पार पडले. महाराष्ट्रात सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले आहे, तर देशात ६७.७१ टक्के मतदान झाले आहे. 

महाराष्ट्रात कुठे किती टक्के मतदान ?

अहमदनगर - ६२. ७६%
औरंगाबाद - ६०. ७३ %
बीड - ६९. ७४ %
जळगाव - ५३. ६५ %
मावळ - ५२. ९० %
नंदुरबार - ६७. १२ %
पुणे - ५१. २५ %
रावेर - ६१. ३६ %
शिर्डी - ६१. १३ %
शिरूर - ५१. ४६ %

देशात कुठे किती टक्के मतदान ?

आंध्रप्रदेश - ७८. २५ %
बिहार - ५७. ०६ %
जम्मू आणि काश्मीर - ३७. ९८ %
झारखंड - ६५. ३१ %
मध्य प्रदेश - ७०. ९८ %
महाराष्ट्र - ५९. ६४ %
ओडिशा - ७३. ९७ %
तेलंगणा - ६४. ९३ %
उत्तर प्रदेश - ५८. ०५ %
पश्चिम बंगाल - ७८. ४४ %

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांच्या तुलनेत चौथ्या टप्प्यात  महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरला आहे. राज्यातील ११ मतदारसंघांपैकी सर्वाधिक ६९. ७४ % बीडमध्ये, तर सर्वांत कमी ५१. २५ % मतदान पुण्यात झाले. देशातील १० राज्यांतील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के झाले. देशात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये ७८. ४४ %, तर सर्वांत कमी जम्मू-काश्मीरमध्ये ३७. ९८ % टक्के मतदान झाले आहे. 


सम्बन्धित सामग्री