भोर पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर दोन चुलत भावांकडून अत्याचार; प्रसूतीनंतर प्रकरण उघडकीस

पुण्याच्या भोर तालुक्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका गावात दोन अल्पवयीन चुलत भावांकडून 14 वर्षीय अल्पवयीन चुलत बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Pune Crime
Pune Crime

पुण्याच्या भोर तालुक्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका गावात दोन अल्पवयीन चुलत भावांकडून 14 वर्षीय अल्पवयीन चुलत बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचारानंतर मुलगी गर्भवती राहीली या अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर हे प्रकरण उघडकीस आले.

पीडितेच्या फिर्यादेनंतर दोन्ही आरोपी भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहीण भावांच्या नात्यांमध्ये काळीमा फासण्याची घटना घडल्याने तालुक्यात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या दोन चुलत भावांनी पीडित अल्पवयीन मुलीवर जानेवारी 2026 मध्ये बळजबरीने दोन-तीन वेळा माळरानावर बळजबरीने अत्याचार केला.

हेही वाचा- शिक्षकाकडून दुसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; 6 वर्षांनी पीडितेला न्याय, नराधमाला…

यादरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी घाबरल्याने हा प्रकार आजपर्यंत कोणालाही सांगितलं नव्हतं. मात्र अल्पवयीन पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला. पीडित मुलगी ससून रुग्णालय येथे उपचारासाठी गेली असता पीडीतेची प्रसूती झाली.

ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भोर पोलीस स्टेशनसी संपर्क करून संबंधित घटनेची माहिती दिली. दरम्यान भोर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ससून रुग्णालयात तात्काळ दाखल होऊन पीडित मुलीचे जाबजबाब नोंदविले. पीडितेची फिर्याद दाखल करून घेतली असून भोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version