“मुलगी वाईट वळणावर गेली होती, तिच्या कृत्यांना वैतागूनच…” जन्मदात्याचा लेकीला संपवल्यानंतर जबाब समोर; पण शेजाऱ्यांनी सांगितलं भलतचं…

साताऱ्यात एका शिक्षकानेच आपल्या स्वतःच्या अवघ्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या डोक्यात बॅट घालून तिचा निर्घृण हत्या केली होती. दरम्यान आता या घटनेत मोठी अपडेट समोर आली आहे.

“मुलगी वाईट वळणावर गेली होती, तिच्या कृत्यांना वैतागूनच…” जन्मदात्याचा लेकीला संपवल्यानंतर जबाब समोर; पण शेजाऱ्यांनी सांगितलं भलतचं…
Satara Crime

दोन दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आणि सुन्न करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उजेडात आली. साताऱ्यात एका शिक्षकानेच आपल्या स्वतःच्या अवघ्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या डोक्यात बॅट घालून तिचा निर्घृण हत्या केली होती. मूळचे चंचळी (ता. कोरेगाव) येथील रहिवासी असलेले पुरुषोत्तम कदम व त्यांची पत्नी शीला हे दोघेही व्यवसायाने शिक्षक आहेत. शनिवारी तपासात रात्री टीव्हीच्या आवाजावरून वाद झाला असल्याचे समोर आले होते.

रागाच्या भरात मुलीने लहान बहिणीला मारहाण केली. त्यानंतर ती बॅट घेऊन वडिलांच्या अंगावर धावून गेली. या वेळी संतप्त झालेल्या पुरुषोत्तम यांनी स्वतःच्याच मुलीची हत्या केली. इतकचं नव्हे तर रविवारी सकाळी त्यांनी मुलगी बेशुद्ध असल्याचे भासवले. तसेच रक्ताचे डाग पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळाची पाहणी आणि फॉरेन्सिक पथकाच्या तपासातून पोलिसांचा संशय बळावला. या ​घटनेनंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा- गोडीगुलाबीने बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते व्हिडिओ बनवले अन्…; ‘त्या’ मागणीसाठी विद्यार्थ्याने प्रोफेसरलाच ब्लॅकमेल केलं

दरम्यान आता या घटनेत मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेची माहिती जेव्हा समोर आली, तेव्हा पोलिसांना जबाब देताना त्या बापाने सांगितलं, “मुलगी वाईट वळणावर गेली होती, तिला व्यसनं लागली होती आणि तिच्या वाईट कृत्यांना वैतागूनच मी हे पाऊल उचललं.” पण ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि समाजात एकच खळबळ उडाली. मात्र, आता या प्रकरणात एक मोठा आणि चक्रावून टाकणारा ट्विस्ट समोर आला आहे.

स्थानिकांनी आणि शेजाऱ्यांनी यावर अत्यंत तीव्र आणि वेगळ्या पद्धतीचा राग व्यक्त केला आहे. स्थानिक लोकांच्या मते, ती मुलगी अत्यंत मनमिळावू, सर्वांशी गोड बोलणारी आणि मिळून-मिसळून राहणारी होती. मग एका बापाने सांगितलेली कथा खरी, की शेजाऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव खरा? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच या हत्याकांडातलं मूळ सत्य काय आहे? याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number